भीमा कोरेगाव

भीमा कोरेगाव हल्ला २०१८ : निरीक्षण

भीमा कोरेगाव हल्ला २०१८ : निरीक्षण

भीमा कोरेगाव हल्ला २०१८ :निरीक्षण या लेखा मागचे प्रयोजन पुढीलप्रमाणेआहे. भीमा कोरेगाव हल्ला २०१८ चे सर्व विडीओ, फोटो, मजकूर इ. ताज्या घडामोडी फेसबूक वर पहात होतो.  ३१ डिसे. २०१७  पासून ते आज पर्यंत सर्व बाबींवर लक्ष ठेवून होतो. भीमा कोरेगाव वरील हिंदुत्ववाद्यांचा हल्ला आणि ३ जाने २०१८ रोजी पुकारलेला महाराष्ट्र बंद आणि त्यानंतर च्या घडामोडी अस्वस्थ करणाऱ्या आहेत.

भीमा कोरेगाव हल्ला २०१८ : निरीक्षण
सुशिक्षित आंबेडकरवादी तरुण पिढी –

या लढयामध्ये जे तरुण होते ते उच्च शिक्षित असल्याचे जाणवले. बरेच जण विद्यार्थी किंवा चांगल्या पदांवर काम करत असलेले होते. आम्ही शिकलो, चांगल्या अधिकारी पदावर काम करतो, चांगले वागतो, तरी आम्हाला तुम्ही का मारता? असा या तरुणांचा सूर आहे.

गाड्या –

बरेच लोक टू व्हीलर, फोर व्हीलर आणि बस नी आले होते. दलित वर्ग आता हळूहळू मध्यमवर्गा कडे सरकत असल्याचे दिसत होते. लोकांचे राहणीमान सुधारले असल्याचे त्यांच्या आर्थिक स्थितीवरून जाणवत होते.

मुस्लीम आणि ओबीसीचा सहभाग –

हळू हळू का होईना पण बहुजन समाज आणि बहुजन तरुण सुद्धा शिकत आहे. काही गोष्टी समजून घेत आहेत. त्यामध्ये परिवर्तन घडत आहे. त्यामुळेच  या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुस्लीम आणि ओ बो सी समुदाय जमलेला असल्याचे जाणवले.

भारतभरातून सहभाग –

महाराष्ट्रा बाहेरून अनेक राज्यातून १ जानेवारी २०१८ ला लोक आले असल्याचे दिसून आले.आणि चांगलीच गर्दी जमली होती. काही संघटनांनी भीमा कोरेगाव च्या लढाईस २०० वर्षे पूर्ण झाली म्हणून भारतभर प्रचार करून लोकांना निमंत्रित केले होते. त्यानुसार लाखो लोक जमले होते. अनेकांचा हा पहिलाच अनुभव होता.

सर्व पुरोगाम्यांचा समन्वय –

३१ डिसेंबर २०१७ च्या एल्गार परिषदेमध्ये बऱ्याच संघटना आणि पक्षाचे लोक सहभागी होते. या मध्ये डावे, समाजवादी, आंबेडकरवादी, गांधीवादी इ. सर्व प्रगतीशील घटक एकत्र आल्याचे दिसून आले. तसेच शेतकरी, आदिवासी, कामगार, महिला इ. तसेच नर्मदा बचाव, ओबीसी संघटना, मुस्लीम संघटना, भटकेविमुक्त इ. संघटना आणि समाज घटक एकत्र आल्याचे दिसून आले.

नवपेशवाई विरुद्ध आवाज बुलंद –

नवपेशवाई असलेली भाजपाची राजवट उलथवून टाकण्याचा निर्धार परिषद, भीमा कोरेगाव मधील अभिवादन आणि हल्ला तसेच बंदच्या दरम्यान दिसून आले. लोक भाजपा सरकार वर भयंकर चिडलेली असून भाजपा ला घरी बसवण्याचा निर्धार सर्वांमध्ये एकदिलाने दिसून आला.

सामाजिक सलोखा –

मराठा आणि नवबौद्ध असा वाद लावण्याचा प्रयत्न हिंदुत्ववाद्यांनी करून पाहिला. वढू आणि शेजारील काही गावे मनोहर भिडे च्या नादाला जरूर लागली होती. मात्र बाकीचा मराठा समाज शांत होता. तसेच मराठा आणि दलित समाज हे समजूतदारपणे वागत होते हे दिसून आले. महाराष्ट्रात बंड दरम्यान हिंदुत्ववादी संघटना वगळता कुठेही दलितांवर मराठ्यांनी हल्ला केला नाही. दलित ही शांत राहिला. आणि शांतपणे सरकार ला जाब विचारत होता. काही ठिकाणी तर अनेक सामाजीक संघटनामार्फत शांतता मोर्चा काढण्यात आला.

मिडीया –

मिडीयाने नेहमीप्रमाणे आपले जातीयवादी स्वरूप प्रदर्शित केले. त्यांनी ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी च्या भीमा कोरेगाव हल्ला २०१८ चे  काहीही प्रदर्शन केले नाही. एव्हाना मिडीया हजर ही राहिला नाही. याउलट ३ जानेवारी रोजी झालेल्या बंद नंतर मिडीयाने आंबेडकरवाद्या विरोधात जनमत तयार करण्यासाठी निगेटिव पद्धतीने बातम्या दिल्या व विडीओ दाखविले. इवन आंबेडकरी नेत्यांना आरोपी ठरवण्याचा आणि अडचणीत आणण्याचा मिडीयाने प्रयत्न केला. आणि आंबेडकर वाद्यांना दंगलखोर ठरवण्याचा प्रयत्न केला. असे दिसून आले.

सरकार –

मुख्यमंत्र्यांनी दोषींना पकडून त्यांच्यावर कारवाई करण्याची घोषणा केली. मात्र बराच काळ हल्लेखोर मोकाट होते. इतकेच नव्हे तर मनोहर उर्फ संभाजी भिडे आणि एकबोटे या मुख्य आरोपींना अद्यापही अटक करण्यात आलेली नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस आणि भारताचे प्रधानमंत्री मोदी यांचे भिडे हे गुरु आहेत. तर सरकारच दंगलखोर आणि हल्ले खोराना पाठीशी घालत असल्याचे दिसून आले. तसेच सरकारने कोम्बिंग ऑपरेशान द्वारे आंबेडकरवादी उच्च शिक्षित तरुणांना खोडसाळ पणे अटक करून त्यांचे करियर बरबाद करण्याचे कार्य चालवले असून शेकडो दलित तरुणांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. हि देखील एक अॅट्रोसिटीच आहे.

पोलीस-

पोलीस यंत्रणेनी देखील भीमा कोरेगाव येथे अभिवादन करण्यास आलेल्या जनतेला कोणतेच संरक्षण पुरवले नाही. फारच कमी पोलीस कुमक घटनास्थळी हजर होती. व जे उपस्थित होते त्यांनी हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला नाही तर बघ्याची भूमिका घेतली. त्यानंतर उलट दलित तरुणांना कोम्बिंग ऑपरेशनद्वारे अटक सत्र सुरु केले आहे. यावरून पोलीस कायद्या प्रमाणे वर्तन करत नसून जातीयवादी सरकारची तळवी उचलन्यातच त्यांनी धन्यता मानली आहे. इतकेच नव्हे तर हल्ले घडवून आणणारे मुख्य सूत्रधार भिडे आणि एकबोटे यांच्याशी पोलिसप्रमुख पुणे यांची मैत्री असल्याचे दिसून आले. तसेच भिडेना ते गुरु मानत आहेत असे दिसून आले.

पुरोगामी कार्यकर्ते –

जवळपास २५० पुरोगामी संघटना या बंद आणि आंदोलनामध्ये सामील होत्या. डावे, समाजवादी, गांधीवादी सहभागी होते. बहुतेक नॉन दलित पुरोगाम्यांनी नेहमी प्रमाणे फारकत न घेता एकत्रित लढा दिला. मात्र काही पुरोगामी नॉनदलित कार्यकर्त्यांनी आणि संघटनांनी स्वत:ला भीमा कोरेगाव प्रकरणा पासून दूर ठेवले.

आदिवासी-

आदिवासी तरुण या लढ्यात काही प्रमाणात असावा. तसा प्रयत्नही झालेला आहे. मात्र आदिवासी संघटना सहभागी झाल्याचे दिसून आले नाही. आदिवासी ताकद जर रस्त्यावर उतरली असती तर दलित, आदिवासी, मुस्लीम आणि कामगार, शेतकरी, ओबीसी यांची एक मोठी एकजूट दिसून आली असती. की जी प्रस्थापितांना धडकी भरायला लावू शकली असती.

तरुणांची उत्स्फूर्त धडपड-

काही तरुण वेळोवेळी कार्यकर्त्याना, समाजाला कायदेविषयक मार्गदर्शन आणि आंदोलन विषयक सुचना देत असल्याचे दिसून आले. कोणकोणत्या स्वरूपाची काळजी घ्यावी इथपासून काय करायला हवे आणि काय करायला नको पर्यंत सर्व मार्गदर्शन ते पार पाडत होते.

सोशल मिडीया-

सोशल मिडीया द्वारे भीमा कोरेगाव मधील हल्ला आणि त्यानंतरचा बंद यांचे चित्रीकरण विडीओ तसेच लाईव विडीओ द्वारे होत होते. तरुण वर्ग हे सर्व लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करीत होता. या चित्रीकरणास सरकार, पोलीस आणि मिडीया अफवा म्हणत असला तरी लोक सत्य काय आहे हे जाणून होते. फेसबूक, व्हाटस अॅप द्वारे हे चित्रीकरण सर्वदूर पोहोचत होते. मुख्य प्रवाहातील मिडीयास लोकांनी नाकारले असल्याचे प्रकर्षाने जाणवले. तरी फेसबुक आणि तत्सम सोशल मिडीया वेब साईट्स नी अनेक लोकांचे प्रोफाईल ब्लॉक केल्याचे दिसून आले.

आंबेडकरवादी वकील-

आज आंबेडकरवादी तरुण मोठ्या प्रमाणात वकील झाले आहेत. त्या सर्व वकिलांनी मोफत केसेस लढवण्याचे आश्वासन दिले आहे. इतकेच नव्हे तर प्रत्यक्ष हे आंबेडकरवादी वकील मोठ्या प्रमाणात लोकाना कायदेशीर मदत करत असल्याचे दिसून आले.

प्रकाश आंबेडकरांचे नेतृत्व-

प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेली भूमिका, अन्य पुरोगामी संघटनाची घेतलेली सोबत, जातीयवादी मिडीयाला दिलेली समर्पक उत्तरे, त्यांचा अभ्यास, नेतृत्व आणि राजकारणाची जाण याची जाणीव या निमित्ताने लोकांना झाली. आणि सर्व गट तटातून बाहेर पडून प्रकाश आंबेडकरासोबत पुढे जाण्याचा जनतेचा निर्धार दिसून आला.

आठवलेचा संधिसाधूपणा-

एका बाजूला आंदोलनात माझ्या पार्टीची माणसे सहभागी आहेत असे सांगायचे. तर दुसऱ्या बाजूला मी मंत्री असल्यामुळे काही बोलू शकत नाही. अशी काहीशी गोंधळलेली भूमिका आठवलेंनी घेतली असल्याचे जाणवले. ऐक्य झाल्यास मी मंत्रीपदाचा राजीनामा देईन आणि ऐक्यात सामील होईन, प्रकाश आंबेडकरांनी अध्यक्ष व्हावे असे म्हणायचं. तर दुसऱ्या बाजूला मंत्रीपदाची हाव बाळगून राहायचं. अशी संदिग्ध आणि संधिसाधू भूमिका आठवले घेत असल्याचे दिसून आले. तर सरकार मध्ये असल्याने सरकार आणि आर एस एस यांना पाठीशी घालत असल्याचे देखील जाणवले. ही लाचारी लोकांना मोठ्या प्रमाणात खटकत होती.

वामन मेश्राम-

बामसेफ, भारत मुक्ती मोर्चा इ. संघटनामार्फत जवळपास २ लाखाहून अधिक लोकाना भीमा कोरेगाव ला निमंत्रित करण्यात आले. तसेच भारत आणि जगभरातून लोक  एकत्र आणल्याचा दावा या संघटणाचे लोक करताना आढळून आले. मोठ्या प्रमाणात एस सी, एस टी, ओ बी सी, मुस्लीम, ख्रिस्चन, बौद्ध लोकांना एकत्र करून मोठी परिषद घेण्यात आली. त्यामुळे हा आक्रोश भारतभर पसरण्यास मदत झाली. ३ जानेवारी रोजी वामन मेश्राम यांनी देखील महाराष्ट्र बंद ची हाक दिली होती. दलिता सोबतच नॉन दलित घटकास सोबत घेण्यात वामन मेश्राम यशस्वी ठरत असल्याचे दिसून येत होते.

समता सैनिक दल-

यावेळी समता सैनिक दलाची संख्या बऱ्यापैकी दिसून आली. शिस्तबद्ध आणि तडफदार सैन्य दिसून आले. हल्ला झाला त्या प्रसंगी त्यांनी काढलेला मार्च आणि त्यांनी केलेले मदत कार्य खरेच डोळ्यात भरेल असे होते. तरीही समता सैनिकांचे अजून मजबूत प्रशिक्षण आणि आणि मजबुती व्हायला हवी. आर्थिक ताकद आणि संख्याबळ यांची सांगड त्यांनी घालायला हवी. नव्या जोमाने त्यांनी कामाला सुरुवात करायला हवे.

मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, न्यायमूर्ती कोळसे पाटील, जितेंद्र आव्हाड आणि शरद पवार यांच्या भूमिका-

मराठा संघटनांनी आणि त्यांच्या नेत्यांनी पुरोगामित्वाला शोभेल अशा भूमिका घेतल्या. मराठा समाजाला दिशा, मार्गदर्शन दिले. हिंदुत्ववाद्यांच्या नादाला लागलेल्या मराठा मंडळीना समजावून दिले. शिवाय भीमा कोरेगाव आणि वळू या गावी जावून त्या पंचक्रोशीत फिरून, त्यांनी मराठा आणि दलित वर्गामध्ये समेट घडवून आणला. या बद्दल त्यांच्या कार्याची प्रशंसा करायला हवी.

निखील वागळे-

आपल्या मुलाखतीद्वारे वागळे यांनी सर्व दलित आणि पुरोगामी संघटनाचे सुयोग्य विश्लेषण केले. आर, एस, एस, मोदी, भाजपा, कर्मठ ब्राह्मण, भिडे आणि एकबोटे यांच्यावर सडकून टीका केली. विशेष म्हणजे मिडियाचे जातीयवादी स्वरूप त्यांनी उघडकीस आणले.

खासदार उदयन भोसले-

शिवाजी आणि संभाजी महाराजांचे वंशज उदयन भोसले हे संभाजी महाराजांच्या बाजूने बोलले नाहीत. तर मनोहर उर्फ संभाजी भिडेंची  बाजू घेत असल्याचे दिसून आले. भिडे हे शिवाजी महाराजांचा अपमान करणारया पैकी एक आहेत. आणि संभाजी महाराजांची हत्या ज्या मनुस्मृती प्रमाणे करण्यात आली ती मानणाऱ्या पेशव्यांपैकी एक आहेत. तसेच भारतीय संविधान न मानणाऱ्या हिंदुत्ववादीअतिरेक्यांपैकी एक आहेत. तरीही उदयन भोसले भिडेची बाजू घेत राहिले. ही बाब खरेतर शिवाजी आणि संभाजी महाराजांचाच अपमान करणारी आहे. कारण याच पेशव्यांच्या पूर्वजांनी शिवाजी आणि संभाजी महाराजाना त्रास दिलेला आहे.

मुस्लीम बांधवांच्या भावना आणि सहभाग-

उमर खालिद हा तरुण एल्गार परिषदेमध्ये हजर होता. त्यांनी अतिशय दणकेबाज भाषण करत दलित मुस्लीमावर अत्याच्यार करणारया सरकारचा धिक्कार केला. इतकेच नव्हे तर भीमा कोरेगाव येथे अनेक मुस्लीम बांधव उपस्थित होते. मुस्लीम संघटनांनी मोर्चे काढून हल्लेखोरांवर कारवाई करण्याची मागणी पोलीस आणि प्रशासनास केली. या वेळी त्यांनी हिरव्या सोबत निळा झेंडा देखील खांद्यावर घेतल्याचे दिसून आले. आणि दलित मुस्लीम एकता प्रदर्शित केली.

सहभागी संघटना बद्दल-

सहभागी संघटनांनी प्रकाश आंबेडकरांचे नेतृत्व मान्य करून संपूर्ण ताकद त्यांच्या मागे उभी केली. मात्र तरीही सहभागी संघटनां आपापले झेंडे घेवून बंद मध्ये सहभागी झाले नाहीत. लाल झेंडे फारसे झळकले नाहीत. कामगार वर्ग लाल झेंडे घेवून रस्त्यावर आला नाही. २०१८ मध्ये देखील जातीयवादा विरोधी लढा कम्यूनीस्ट समाजवादी संघटना आणि पक्ष नीटसे लढू शकले नाहीत असे जाणवले.

महाराष्ट्राबाहेरील प्रतिक्रिया-

महाराष्ट्राबाहेर अनेक राज्यात भीमा कोरेगाव चे पडसाद जाणवले. दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा, पंजाब, गुजरात, दक्षिण भारत इ. ठिकाणी मोठमोठे मोर्चे निघाले. सभा झाल्या. निदर्शने झाली. आंबेडकरवादी संघटनासोबतच मार्क्सवादी संघटनाही यामध्ये सहभागी असल्याचे दिसून आले.

जिग्नेश मेवानी –

गुजरातचे आमदार जिग्नेश च्या माध्यमातून तरुण नेतृत्व या ठिकाणी ठळकपणे दिसून आले.जिग्नेश आणि उमर यांचेवर भडकाऊ भाषणांचे आरोप करत खोट्या केसेस करण्यात आल्या. जयभीम आणि लाल सलाम यांची एकत्र मोट बांधून पुढे जावू इच्छिणारा जिग्नेश खरच एक आशादायक चित्र उभे करेल अशी आशा आहे. मात्र डाव्यांचा द्वेष करणारे लोक त्यास साथ देण्यास तयार नाहीत. न डगमगता तो खंबीर पणे पाय रोवून उभा तर आहेच मात्र प्रस्थापितांच्या उरात धडकी भरवत आहे.

तर हे होते भीमा कोरेगाव हल्ला २०१८ : निरीक्षण

भीमा कोरेगाव हल्ला २०१८ : निरीक्षण

लेखक :

सचिन मोरे

संस्थापक :

ह्युमन लिबर्टी

About the author

Sachin More

Hi,
I am Sachin More
President of Human Liberty Organization
Blogger at http://humanliberty.co.in/
YouTube Creator at Human Liberty Channel

View all posts

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *