कार्ल मार्क्सचा वर्गसंघर्षाचा सिद्धांत

कार्ल मार्क्सचा वर्गसंघर्षाचा सिद्धांत

कार्ल मार्क्सचा वर्गसंघर्षाचा सिद्धांत

कार्ल मार्क्सचा वर्गसंघर्षाचा सिद्धांत यास  विशेष महत्व आहे. साम्यवादी घोषणापत्रानुसार (Communist Manifesto) आतापर्यंतचा संपूर्ण समाजाचा इतिहास हा वर्ग संघर्षाचा इतिहास राहिलेला आहे.

मार्क्सच्या म्हणण्यानुसार सामाजिक परिवर्तनाचे मूळ कारण उत्पादन प्रणाली (Mode of Production) मध्ये बदल हे आहे. उत्पादन प्रणालीस तो समाजाची आर्थिक संरचना (Economic Structure) असे म्हणतो. त्याच्या म्हणण्यानुसार जेंव्हा उत्पादन प्रणालीमध्ये बदल होतो, तेंव्हा समाजात देखील बदल दिसून येतो. या प्रकारे मार्क्स आपला संपूर्ण सिद्धांत आर्थिक आधारावर केंद्रित करतो. किंवा भौतिकवादास सर्वोच्च प्राधान्य देतो.

मार्क्सच्या उत्पादन प्रणालीची  ३ सूत्रे
  1. उत्पादनाची साधने : कच्चा माल, भांडवल, तंत्रज्ञान इ.
  2. उत्पादन शक्ती : उत्पादनाची साधने + श्रम शक्ती
  3. उत्पादन प्रणाली : उत्पादनाची शक्ती + उत्पादन संबंध

कार्ल मार्क्सचा वर्गसंघर्षाचा सिद्धांतमार्क्सच्या म्हणण्यानुसार बदलाची सुरुवात उत्पादनाच्या साधनांच्या बदलापासून होते. यामध्ये तंत्रज्ञान महत्वपूर्ण भूमिका निभावते. तंत्रज्ञानातील बदलामुळे श्रम शक्ती मध्ये बदल होतो. अर्थात श्रमिकांची कुशलता वाढते. तसेच बौद्धिक विकास होतो. उत्पादनाची साधने तसेच श्रम शक्ती मधील बदलासोबत उत्पादन शक्ती देखील बदलून जाते. उत्पादन शक्ती मधील बदलामुळे मालक आणि मजूर यांच्यातील उत्पादन संबंधामध्ये बदल होतो. ज्यामुळे उत्पादन प्रणाली देखील बदलून जाते. मार्क्स उत्पादन प्रणालीच्या आधारावर समाजाच्या ऐतिहासिक विकासाच्या विविध अवस्थांचा उल्लेख करतो.

प्रथम अवस्था आदिम साम्यवाद :

या अवस्थेत लोक फळ खाणे किंवा शिकार करून जगत असत. या काळात उत्पादनाच्या साधनावर कुणाचीही व्यक्तिगत मालकी नव्हती. यामुळे या काळात ना कोणता वर्ग होता ना कोणत्या प्रकारचे शोषण.

दुसरी अवस्था प्राचीन समाज :

या अवस्थेत व्यक्तिगत संपत्तीचा उदय होतो. ज्यामुळे वर्गास प्रारंभ होतो. या अवस्थेत दास प्रथेचा जन्म होतो.

तिसरी अवस्था सरंजामशाही युग :

या अवस्थेत सत्तेवर राजाचा अधिकार होता. ज्यांनी आपली सर्व जमीन सरंजामदारांना वाटलेली होती. सरंजामदारांचा पूर्ण अधिकार भूमिहीन शेतमजुरांवर होता. ज्यास मार्क्स अर्ध दास (Serf) असे म्हणतो.

चवथी अवस्था भांडवलशाही :

ही अवस्था औद्योगिक क्रांतीच्या फलस्वरूप अस्तित्वात आली. यामध्ये उत्पादन खूप जास्त झाले. तसेच बेकारी देखील वाढली. त्यामुळे वेतनाचे दर घसरले. आणि भांडवलदारांद्वारे शोषण देखील वाढले. या काळात भांडवलशाही आणि सर्वहारा (मजूर) वर्ग अस्तित्वात आला. हेच वर्तमान कालीन युग आहे.

मार्क्सची विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे इतिहासापासून ते वर्तमानापर्यंत त्याने चार अवस्थांची चर्चा तर केलीच. त्याशिवाय भविष्यातील समाजवाद आणि साम्यवाद  या दोन अवस्था बद्दल देखील त्याने चर्चा केली आहे.

द्विवर्गीय व्यवस्था

मार्क्सच्या म्हणण्यानुसार जर ऐतिहासिक दृष्टीने पाहिले तर जसजशी उत्पादन प्रणाली बदलत गेली तसतसे समाज बदलत गेले. परंतु द्विवर्गीय व्यवस्था कायम राहिली ज्यामध्ये एक वर्ग शोषक (Haves) होता. तर दुसरा वर्ग शोषित (Have nots) होता.

पण मार्क्स म्हणतो की भांडवलशाही मध्ये संघर्ष होणार.

मार्क्सने भांडवलशाहीच्या आधीच्या दास किंवा शेतमजूराना स्वत: मधील वर्ग (Class in itself) असे म्हटले. कारण त्यांची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती समान होती परंतु त्यांमध्ये चेतना म्हणजेच वर्गजाणीवेचा अभाव होता. म्हणूनच ते असंघटीत होते. आणि वर्ग विरोधास वर्गसंघर्षापर्यंत घेवून जावू शकले नाहीत. पण मार्क्स म्हणतो की भांडवलशाही मध्ये संघर्ष होणार. कारण हा समाज अनेक अर्थांनी भूतकाळातील समाजापेक्षा वेगळा आहे.

भांडवलशाहीमध्ये उत्पादन हे नफ्यासाठी होते. तर भूतकाळातील समाजात ते उपभोगासाठी होत होते. त्याचबरोबर या समाजात उत्पादनाचे यांत्रीकीकरण झालेले आहे. ज्यामुळे श्रमिक वर्गाचे महत्व कमी झालेले आहे. या समाजात भांडवलदार आणि श्रमिकामध्ये रोखीचे (आर्थिक) संबंध आहेत. ज्यामुळे या दोन वर्गात कोणत्याही प्रकारचे भावनात्मक, सांस्कृतिक किंवा परंपरागत संबंध नाहीत.

श्रमिकांमध्ये परकेपणाची भावना

उद्योगपतींमध्ये आपसात स्पर्धा तसेच नफेखोरीच्या मनोवृत्तीमुळे श्रमिक सावध झाला आहे. खूप साऱ्या यांत्रिकीकरणामुळे या काळात श्रमाचे महत्व कमी झाले आहे. ज्यामुळे श्रमिकांमध्ये भांडवलदारांविषयी परकेपणाची भावना मूळ धरत आहे.

मार्क्स म्हणतो की जसजसे भांडवलदार अर्थव्यवस्थेवर आपली पकड बसवत जाईल, तसतसे ते धर्म, कायदा इ. संरचना आपल्या नियंत्रणात करत जातील. यामुळे भांडवलदारास जे वाटेल ते तो करेल. आणि श्रामिकास न्याय मिळणार नाही.

मार्क्स म्हणतो ही स्थिती श्रमिकांमध्ये चेतना उत्पन्न करेल. तसेच श्रमिकांच्या शोषणाचे स्वरूप, जीवनशैली, समस्या प्रमाणेच त्यांच्या चेतनेचा स्तर देखील समान असेल. आणि शेवटी याच चेतनेमुळे श्रमिक संघटीत किंवा सक्रीय बनेल. या ध्रुवीकरणानंतर समाज दोन वर्गात विभाजित होईल. 1. भांडवलदार (बुर्जुवा) २. सर्वहारा (श्रमिक)

सामाजिक परिवर्तनाचे चक्र केंव्हा थांबेल?

मार्क्स म्हणतो की रक्तरंजित क्रांतीनंतर काही काळ कामगार वर्गाची हुकुमशाही स्थापित होईल. ज्यास तो समाजवाद म्हणतो. शेवटी कामगार वर्ग आपली सत्ता सोडून जनसामान्यांमध्ये सामील होईल. हाच साम्यवादी समाज असेल. मार्क्सच्या म्हणण्यानुसार या काळात कुटुंबसंस्था किंवा जनतेची अफू म्हणजे धर्माचा निषेध होईल. या काळात ना वर्ग असेल ना खाजगी संपत्ती. सगळ्यांना आपापल्या आवडीप्रमाणे काम मिळेल. आणि आवश्यकतेनुसार वेतन मिळेल. पोलीस, प्रशासन, सेना इ. संस्था समाप्त होतील. आणि सामाजिक परिवर्तनाचे चक्र कायमस्वरूपी थांबून जाईल.

कार्ल मार्क्सचा वर्गसंघर्षाचा सिद्धांत : अधिक विस्ताराने

कार्ल मार्क्सचा वर्गसंघर्षाचा सिद्धांतमार्क्सने इतिहासाची आर्थिक व्याख्या किंवा आर्थिक नियतीवादाचा सिद्धांत प्रतिपादन केला आहे. त्यानुसार समाजात सदैव विरोधी वर्गाचे अस्तित्व राहिलेले आहे. एक वर्ग असा आहे की ज्याचेकडे उत्पादन साधनांची मालकी आहे. आणि दुसरा वर्ग असा आहे की जो केवळ शारीरिक श्रम करतो. पहिला वर्ग हा सदैव दुसऱ्या वर्गाचे शोषण करत राहतो. आणि हे समाजाचे शोषक आणि शोषित वर्ग नेहमी आपापसात संघर्षरत राहिलेले आहेत.

वर्ग (Class) म्हणजे काय?

वर्ग व्यक्तींच्या अशा समुदायास म्हणतात की जो उत्पादनाच्या कोणत्यातरी प्रक्रियेशी संबंधित असेल. आणि ज्यांचे साधारण हित एक असतील.

मार्क्स आपल्या वर्ग संघर्षाच्या सिद्धांतामध्ये समाजामध्ये उत्पादन किंवा वितरणावर आधारित दोन वर्ग असतात असे मानतो. की जे आपल्या विरोधी हितांच्या कारणांमुळे परस्पर संघर्षरत राहतात. वर्गांच्या स्वरूपामध्ये जरी अंतर येत राहिले. किंवा समाजात एक वर्ग उत्पादनाची साधने – जमीन आणि भांडवल यावर अधिकार राखतो. त्यास जमीनदार किंवा भांडवलदार वर्ग म्हणतात. दुसरा या वर्गाचा आश्रित राहणारा किंवा कठोर परिश्रम करणारा वर्ग आहे. पहिला वर्ग दुसऱ्या वर्गाच्या शोषणाद्वारे लाभ उठवतो. म्हणजेच श्रमजीवी वर्गाचे शोषण करतो. दुसरा वर्ग पुरेसे श्रम करून सुद्धा जीवनाची अत्यावश्यक गरजा भागवणारी साधने देखील मिळवू शकत नाही. आणि त्याचे निरंतर शोषण होत राहते. या दृष्टीने पहिल्या वर्गास शोषक आणि दुसऱ्या वर्गास शोषित म्हटले जावू शकते.

वर्गसंघर्षाचा आधार

उत्पादनाच्या प्रत्येक प्रणालीमध्ये समाज अशा दोन विरोधी गटात विभक्त होवून जातो. आणि या गटांचे परस्पर विरोधी हित असते. भांडवलदार आणि श्रमिक दोघे एकमेकांची गरज असले तरी त्यांच्या हितांमध्ये परस्पर विरोध आहे. भांडवलदारास स्वाभाविकपणे श्रामिकास कमीत कमी मजुरी द्यावीशी वाटते. ज्यामुळे त्यास अधिकाधिक लाभ मिळेल. आणि मजूरास अधिकाधिक मजुरी घ्यावीशी वाटते. हितांमध्ये परस्पर विरोध असल्या कारणामुळे दोघांमध्ये संघर्षास प्रारंभ होतो. हाच वर्गसंघर्षाचा आधार आहे. आणि याच कारणामुळे वर्गसंघर्ष सातत्याने चालत आलेला आहे.

वर्ग संघर्षाची परिणती

मार्क्स आणि एंगल्स यांनी साम्यवादी घोषणापत्रात पुढील प्रमाणे लिहिले आहे . स्वतंत्र व्यक्ती किंवा दास, श्रीमंत किंवा सामान्य जन, जमीनदार किंवा भूदास थोडक्यात पाहिले तर उत्पिडक किंवा उत्पिडीत हे कधी कधी लपून छपून तर कधी कधी उघडपणे संघर्ष करत असतात. या संघर्षाची परिणती प्रत्येकवेळी एक तर समाज क्रांतिकारी पुन:निर्माणातून झालेली आहे. किंवा संघर्ष करणाऱ्या वर्गांच्या सर्वनाशातून झालेली आहे.

वर्गासंघर्षाच्या आपल्या या धारणेच्या आधारावर कार्ल मार्क्स भांडवलशाहीच्या अंताची आवश्यकता व्यक्त करतो. त्याच्या म्हणण्यानुसार भांडवलशाही व्यवस्थेमध्ये स्वयं आपल्या विनाशाची बीजे अंतर्भूत आहेत.

भांडवलशाहीचे आंतरराष्ट्रीय स्वरूप

भांडवलदारांचा उद्देश अधिकाधिक उत्पादन करणे हा आहे. ज्यामुळे धनाचे केंद्रीकरण खूप थोड्या व्यक्तींकडे होत जाते. या कारणामुळे भांडवलदारांच्या संख्येत सातत्याने कमी तर श्रमिकांच्या संख्येत वाढ होत जाते. भांडवलदार आपल्या आर्थिक लाभांच्या कारणांसाठी एकाच ठिकाणी अधिकाधिक उद्योग उभे करतात. श्रमिकांच्या एकत्र काम करण्यामुळे श्रमिक संघटीत होतो. तसेच त्यांच्यामध्ये वर्गीय चेतनेचा विकास होतो. जेंव्हा हे मजुरांचे संघटन मोठे होते तेंव्हा ते भांडवलशाही प्रणालीच्या विरुद्ध होवून जाते.

उद्योगांमध्ये उत्पादन अधिक झाल्यावर त्याच्या विक्रीसाठी दुसऱ्या देशातील बाजार शोधले जातात. विकसित भांडवलवादी देशातील भांडवलदार दुसऱ्या देशात भांडवल गुंतवू लागतात. या कारणामुळे भांडवलशाही विश्वव्यापी आणि आंतरराष्ट्रीय स्वरूप धारण करते.

शेवटी जसजसे श्रमिक वर्गाच्या शक्तीमध्ये वाढ होते  आणि भांडवलवादी शक्तीचा ऱ्हास होतो तसतसे हा संघर्ष राष्ट्रीय नंतर आंतरराष्ट्रीय होत जातो. भांडवलदारवर्गास पराजित करून श्रमिक वर्ग आपले अधिनायकत्व स्थापित करतो.

भांडवलशाहीचा विनाश आणि सर्वहारा वर्गाच्या विजया

हे या कारणामुळे होते की सर्व देशातील श्रमिक हे समान रूपाने भांडवलशाहीच्या शोषण आणि अत्याचाराचे पिडीत असतात. यामुळे श्रमिक आंदोलन खूप जास्त संघटीत होऊन जाते. मग भांडवलशाही या संघटीत आंदोलनाच्या समोर टिकत नाही. आणि या प्रकारे भांडवलशाही स्वत:च आपल्या विनाशाचे कारण बनते. आणि या प्रकारे श्रमिक वर्गाचा जो संघर्ष असतो तो भांडवलशाहीचा विनाश आणि सर्वहारा वर्गाच्या विजयाचा मार्ग प्रशस्त करेल.

या प्रकारे मार्क्सचा विश्वास होता की जेंव्हा श्रमिक वर्गाचे अधिनायकत्व स्थापित होईल तेंव्हा हळू हळू भांडवलदार वर्गाचे अंतिम अवशेष देखील समाप्त करण्यात येतील. आणि त्यानंतर एक वर्गविहीन किंवा राज्यविहीन समाजाची स्थापना होईल. यासाठी मार्क्स क्रांतीचे आवाहन करतो. आणि मार्क्सच्या म्हणण्यानुसार वास्तविक समाजवादाच्या स्थापनेसाठी श्रमिक वर्गाची क्रांती प्रमुख अट आहे.

कार्ल मार्क्सचा वर्गसंघर्षाचा सिद्धांतकार्ल मार्क्सचा वर्गसंघर्षाचा सिद्धांत : टीका

इतिहासाला समजण्यासाठी किंवा सामाजिक विकासाची प्रक्रियेला समजण्यासाठी मार्क्सचा वर्ग संघर्षाचा सिद्धांत अत्यंत महत्वपूर्ण आहे. परंतु यावर वेगवेगळ्या आधारांवर टीका करण्यात आलेली आहे.

  1. समाजात केवळ दोनच वर्ग भांडवलदार वर्ग किंवा श्रमिक वर्ग नाहीत. तर तिसरा मध्यमवर्गीय बुद्धीजीवी वर्ग सुद्धा आहे. ज्याची मार्क्सने अवहेलना केली आहे. या वर्गाने समाजाच्या विकासामध्ये महत्वपूर्ण भूमिका निभावलेली आहे.
  2. त्याने सामाजिक आणि आर्थिक या दोन वर्गांना एक मानलेले आहे. परंतु वर्गांना केवळ आर्थिक आधारावर विभागाने योग्य नाही. समाजाचे योग्य विश्लेषण जाती, धर्म, व्यवसाय, शिक्षण या सर्व आधारावर असायला हवे.
  3. मार्क्सची धारणा आहे की संघर्ष हे सामाजिक जीवनाचा मुलतत्व आहे. मात्र मानव जीवनाचे संचालक तत्व हे केवळ संघर्ष नसून प्रेम, सहयोग आणि सामंजस्याची भावना देखील आहे.
  4. मार्क्सच्या वर्गसंघर्षामध्ये सर्वहारा वर्गाच्या क्रांतीची चर्चा केली आहे. मात्र इतिहास साक्षी आहे की ज्या पण क्रांत्या झालेल्या आहेत त्यांचे नेतृत्व श्रमिक वर्गाद्वारे नव्हे तर बुद्धीजीवी मध्यम वर्गाद्वारे झालेले आहे.
  5. मार्क्सचे हे म्हणणे आहे की मानवी जीवनाचा संपूर्ण इतिहास हा वर्गसंघर्षाचा इतिहास आहे. पण ऐतिहासिक दृष्टीने पाहिल्यास धर्म, शक्तीची इच्छा, दुर्भावना इत्यादी देखील संघर्षाची करणे आहेत.
  6. मार्क्सने आपल्या सिद्धांतात भांडवलशाहीच्या अंताची आणि समाजवादाच्या स्थापनेची संभावना व्यक्त केली आहे. मात्र भांडवलशाहीने स्वत:ला बदललेल्या परिस्थितीनुरूप बदलले आहे. (मजुरांचे कामाचे तास घटविणे, त्यांची चांगली स्थिती इ.)
  7. मार्क्सची ही भविष्यवाणी देखील खरी ठरली नाही की भांडवलशाहीच्या विनाशानंतर सत्ता श्रमिक वर्गाच्या हातात जाईल. फासीवाद, अधिनायकवाद सारखे आणखी पर्याय देखील आहेत.

 

संदर्भ :   १. https://www.rsedublog.in/2019/10/18/theory-of-class-struggle/

२. https://www.youtube.com/watch?v=-siafU-L0TQ

कार्ल मार्क्सचा वर्गसंघर्षाचा सिद्धांत

Me too Campaign - Human Liberty ची भूमिका

लेखक :

सचिन मोरे

संस्थापक :

ह्युमन लिबर्टी

 

About the author

Human Liberty

Hi,
We are comrades of Human Liberty organization. We are dedicated to revolution for communism.
Buddhism, Marxism & Ambedkarism is a base of our organization.
We are working with weaker section of society to establish liberty, equality & fraternity in world.

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *