गुढीपाडवा

गुढीपाडवा : आढावा शिवशाही ते लोकशाही

गुढीपाडवा: शिवशाही ते लोकशाही

आढावा – गुढीपाडवा: शिवशाही ते लोकशाही. गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला झालेला संभाजी महाराजांचा खून. संभाजी राजांची ब्राह्मणी लेखकांकडून बदनामी. आणि त्याच दिवशी गुढ्या उभारून व्यक्त होत असलेला आनंद. ही शृंखला या वर्षी मराठा आणि बहुजन समाजाने मोडली.

अशुभ मानला गेलेला उलटा तांब्या, कडुलिंब, आणि बांबू यांची गुढी नाकारली गेली. भगव्या पताका आज महाराष्ट्रभर गुढीपाडवा या दिवशी घरोघर फडकल्या. संभाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. आणि वाटले या लोकशाहीत पेशवाई मातीत गाडून मिळवलेला शिवशाहीचा हाच खरा विजय. हे सर्व समजून घेण्यासाठी चला तर शिवशाही ते लोकशाही हा प्रवास समजून घेवूयात.

शिवाजीचे लोककल्याणकारी राज्य : शिवशाही

शिवाजी हा खरेच लोककल्याणकारी राजा होता. शिवाजीचे असंख्य मावळे हे शिवाजीसाठी मरायला तयार होते. त्याच्या सैन्यात जीवा काशीद, मदारी मेहतर असे सर्व जातीधर्माचे लोक असत.

शेतजमीन मोजून शेतसारा किती वसूल करावा हे शिवाजीने ठरवून दिले. दुष्काळ पडल्यावर शेतसारा वसूल करायचा नाही. उभ्या पिकातून घोडदळ घेवून जायचे नाही. तर शेताच्या बांधावरून कडेनी जायचे. लाकूड फाटा आवश्यक असल्यास शेतकऱ्याची परवानगी घेवून त्यांना द्रव्य देवून खरेदी करावे. स्वारीवर जाताना एखाद्या गावी जर मुक्काम झाला. तर घोडदळा साठीचा दाना पाणी आणि सैन्याला आवश्यक ते जेवण गावकऱ्याना द्रव्य देवून खरेदी करावे. जनतेच्या भाजीच्या देठालाही हात लावता कामा नये. असे त्यांचे आदेश होते. शिवाजीने इनाम द्यायचे बंद केले. उलट दिलेल्या इनामापैकी त्यांचा वारस गेला. की पुन्हा त्यास इनाम देण्यात आले नाही. कारण हे इनामदार रयतेची पिळवणूक करत असत.

शिवाजी महाराजांनी रयतेच्या अब्रूची काळजी केली. बलात्कारी पाटलाच्या पोराच्या मुसक्या बांधून आणल्या. आणि त्याचे हात पाय तोडण्याची शिक्षा दिली. शत्रूच्या स्त्रीवर हात टाकणाऱ्या सरदाराचे डोळे काढले. त्याला त्याच किल्याच्या तुरुंगात आयुष्यभर खितपत ठेवण्याची शिक्षा देण्यात आली.

शिवाजी हा मुस्लिमद्वेष्टा नव्हता. तर शिवाजीच्या पदरी अनेक मुस्लीम सैनिक होते. त्यांच्या तोफखान्याचा प्रमुख मुस्लीम होता. त्यांच्या आरमाराचा प्रमुख, सेनापती, वकील हे सर्व मुस्लीम होते. शिवाजी महाराजांना मुस्लीम राजापेक्षा जास्त लढाया मराठ्यांशी कराव्या लागल्या.

ब्राह्मणांचा खोडसाळपणा

शिवाजी महाराजांना गोब्राह्मण प्रतिपालक असे ब्राह्मणाकडून खोडसाळपणे म्हटले जाते. शिवाजीने स्वत:ला असे कधीही म्हणून घेतले नाही. उलट शिवाजी हे क्षत्रिय नाहीत. तर ते शुद्र वर्णातील आहेत. आणि त्यांना राजा बनण्याचा अधिकार नाही. असे ब्राह्मणांचे मत होते. महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी शिवाजीच्या राज्याभिषेकास विरोध केला होता. त्यावेळी गागाभट्टास भरपूर द्रव्य देवून राज्याभिषेक करून घ्यावा लागला.असे असले तरी शिवाजीला मदत करणारे काही ब्राह्मण देखील होते.

संदर्भ : कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे भाषण. Satyashodhak Sanskrutik Manch, You tube.

संभाजी महाराज

रयतेचे कल्याण करू पाहणारा हा शिवाजी सर्व जाती धर्मातील लोकांना समान मानणारा राजा होता. तसेच ते शुद्र असल्याने त्यांना राजा बनण्यासदेखील ब्राह्मणांचा विरोध होता. यामुळे एका बाजूला शिवाजीचे राज्य धुळीला मिळवून ब्राह्मणी राज्य प्रस्थापित करण्याचे षडयंत्र रचले गेले. शिवाजीला विष देवून ठार मारण्यात आले. तर दुसऱ्या बाजूला संभाजी राजे विरुद्धही कट रचण्यात आला.

संभाजी राजे यांना औरंगजेब याने कपटाने पकडले. संभाजी महाराज हे विद्याविभूषित होते. संस्कृतचे पंडित होते.औरंगजेबाकडे अनेक ब्राह्मण चाकरी करत होते. त्यांच्या सांगण्यानुसार मनुस्मृती प्रमाणे त्यांचे हाल हाल करून संभाजी महाराजांना ठार करण्यात आले. कारण मनुस्मृती प्रमाणे जो शुद्र वेद ऐकेल त्याच्या कानात तापते शिसे ओतायचे. वेद बोलेल त्याची जीभ छाटायची. जो शुद्र वेद वाचेल त्याचे डोळे काढायचे. तर वेद लिहील त्याचे हात तोडायचे. अशा भयंकर शिक्षा होत्या.

गुढीपाडवा : आणि छत्रपती संभाजी राजेंचा निघ्रून खून

११ मार्च १६८९ रोजी गुढीपाडवा च्या पूर्व संध्येला छत्रपती संभाजी राजेंचा निघ्रून खून केला. त्यांचे तुकडे तुकडे करून भीमा नदीत फेकून देण्यात आले.

वढू गावात जनाबाई ही परिट समाजातील स्त्री नदीवर कपडे धूत होती. त्यावेळी तिच्या हाताला मांसाचे गोळे लागले. कुणीतरी बोकडाचे मांस कापून नदीत फेकलय असं समजून तिने तो मासाचा गोळा दूर फेकला. ते पाहून त्या गावातील धनगर तिला सांगतो. की ते बोकडाचे मांस नसून संभाजी राजांचे तुकडे करून नदीत फेकून दिलेत. आणि औरंगजेबाने फतवा काढला आहे. की जो कुणी त्या मासाला हात लावेल त्याचेही तसेच हाल होतील.

जनाबाई

जनाबाई संभाजीराजांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार व्हावेत. म्हणून तळमळीने  ही बातमी गावातील पाटलीन बाईला सांगते. मात्र घाबरलेली पाटलीन बाई तिला औरंगजेबाच्या फतव्याची आठवण करून देते. आणि गुमान घरी जा असा सल्ला देते. मात्र जनाबाई गावात प्रत्येकाला ही बातमी सांगते. आणि काहीतरी करायची विनंती करते. मात्र कुणीही पुढे येत नाही.

गोविंद महार

त्यावेळी १३ मार्च १६८९ या दिवशी महार समाजातील गोविंद महार (गायकवाड) आणि त्याचे भाऊबंध पुढे आले. त्यांनी संभाजी महाराजांचे तुकडे गोळा करून आणले. अग्नी देण्यासही  कोणी जागा देत नव्हते. म्हणून मग वढू गावातील महार लोकांनी महारवाड्यात संभाजी महाराजांच्या मृतदेहास अग्नी दिला.

पेशवाईची जुलमी राजवट

त्यानंतर ब्राह्मणांनी पेशवाईची राजवट प्रस्थापित केली. संभाजीराजेंच्या मृतदेहास महारांनी अग्नी दिला. ही बातमी औरंगजेब आणि ब्राह्मणांना समजली. आणि त्यांनी महारांवर अनंत अत्याचार केले. यामुळे ब्राह्मण महारांचा खूप द्वेष करत. महारांची थुंकीही रस्त्यावर पडू नये. म्हणून पेशव्यांनी त्यांच्या गळ्यात मडके बांधले. तर त्यांच्या पायाचे ठसे जमिनीवर उमटू नयेत. म्हणून पाठीला झाडू बांधण्यात आला. मनुस्मृतीचे राज्य प्रस्थापित करण्यात आले. ब्राह्मण पुरुष सोडून इतरांना शिक्षणाची दारे बंद करण्यात आली.

महारांच्या अपमानाचा आणि संभाजी महाराजांच्या खुनाचा बदला

आपली हरवलेली प्रतिष्ठा आणि स्वाभिमान महारांना परत मिळवायचा होता. अशा वेळेस इंग्रजांची नजर महारांवर पडली.महार हे अंगाने भारीभक्कम आणि निडर स्वभावाचे होते. म्हणून इंग्रजांनी १७५७ मध्ये महारांना सैन्यात सामील करून घेतले. त्यावेळी पेशव्यांच्या सैन्यात महारांना प्रवेश नव्हता. तर इकडे इंग्रजांनी महार बटालियन तयार केली होती.

१८५७ मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्याने पुण्यातील इंग्रज वकिलातावर हल्ला केला. त्यामध्ये इंग्रजाना अपयश आले. पुणे काबीज करण्यासाठी नोव्हेंबर १८१७ मध्ये दुसरा बाजीराव आपले सैन्य घेवून मजल दरमजल करत निघाला होता. ही गोष्ट मेजर कर्नल फिल्समन यास कळाली. यावेळी सेकंड महार बटालियनची त्याने नियुक्ती केली. आणि १ जानेवारी १८१८ रोजी झालेल्या लढाईत ८०० महार बटालियन च्या सैनिकांनी २८००० पेशव्यांच्या सैन्याला हरवले. या ८०० महारांनी मिळविलेल्या विजयाचे प्रतिक म्हणून इंग्रजांनी भीमा कोरेगावला २६ मार्च १८२१ मध्ये विजयस्तंभ उभारला. संदर्भ : Truth of Indian History, you tube.

इंग्रज राजवट

इंग्रज सरकार आले. आणि त्यांनी भारतात इंग्रजी शिक्षण सुरु केले. त्यांनी भारतीयांसाठी इंग्रजी शाळा सुरु केल्या. ब्रिटीश सैनिकांच्या मुलांना हे शिक्षण मोफत आणि सक्तीचे केले. हे शिक्षण देताना त्यांनी जात, धर्म इ.चा विचार केला नाही.

या शिक्षणामुळे भारतीय शिक्षित पिढीला विदेशी विचारवंत, तत्वज्ञान, समाज व्यवस्था, धर्म यांची ओळख झाली. आणि भारतीय व्यवस्थेतील अनिष्ठ रूढी, परंपरा, जाती व्यवस्था, अंधश्रद्धा यांची जाणीव झाली. त्यामुळे फुले, आंबेडकरांप्रमाणेच र. धो. कर्वे, आगरकर, साने गुरुजी अशा समाज सुधारकांची परंपरा भारतात विशेषत: महाराष्ट्रात निर्माण झाली.र. धो. कर्वेनी लैंगिक समस्याविषयी जाचक रूढींवर प्रहार करून समाज परिवर्तनाचे काम केले. आगरकरांनी अंधश्रद्धा आणि परंपरा वर टीकेची झोड उठवली.

महात्मा फुले

महात्मा फुले नी आपली पत्नी सावित्रीबाईला शिक्षण देवून भारतातील मुलींची पहिली शाळा पुण्यात काढली. ब्राह्मण विधवा स्त्रीयांच्या केशवपनास विरोध केला. ही प्रथा बंद पाडण्यासाठी त्यांनी नाभिकांचा संप घडविला. अस्पृश्यांसाठी त्यांनी स्वत:च्या घरातील पाण्याचा हौद खुला केला.

गरोदर विधवां स्त्रीयांसाठी आश्रम सुरु केला. त्याठिकाणी मुलास जन्म देवून मूल हवे असल्यास घेवून जावू शकतात. नको असल्यास ठेवून जावू शकतात अशी सोय केली. शेतकऱ्यांच्या मुक्तीसाठी काम केले. शुद्र अतिशुद्रांच्या कल्याणासाठी मोठी प्रबोधन चळवळ चालवली.

शाहू महाराज

शाहू महाराजांनी तिकडे आपल्या कोल्हापूर संस्थानात आरक्षणाचा भारतातील पहिला प्रयोग यशस्वी केला. ते धर्मातील ब्राह्मणी वर्चस्वा विरुद्ध उभे राहिले.

त्यांनी आपल्या संस्थानात एका अस्पृश्य व्यक्तीस हॉटेल काढून दिले. त्याच्या हॉटेल मध्ये कोणी जात नाही म्हणून ते स्वत: तिथे जावू लागले व चहा पिऊ लागले. त्यांनी सर्व जातीच्या मुलांसाठी शाळा सुरु केल्या. आणि विशेष म्हणजे त्यांनी बाबासाहेबांना शिक्षणासाठी आणि चळवळीसाठी भरघोस अशी आर्थिक मदत देवू केली.

कर्मवीर भाऊराव पाटील आणि पेरियार

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था सुरु केली. त्यामध्ये त्यांनी सर्व जाती धर्माच्या मुलांना शाळा सुरु केल्या. त्यांच्या शाळां आणि हॉस्टेलमधून जातीयता, अस्पृश्यता मिटून जातील असे संस्कार मुलांवर घडवले जात असत.

तिकडे दक्षिण भारतात पेरियार यांनी ब्राह्मणवादा विरुद्ध मोठी प्रबोधन मोहीम उघडली. त्यांनी खूप मोठा संघर्ष तिकडे केला. महात्मा गांधीनी ही अस्पृश्यता निवारण, स्त्री पुरुष समानता, स्वातंत्र्य चळवळ अशी महान कार्ये हाती घेतली होती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उच्च शिक्षण मिळवले. भारतातील ते सर्वात जास्त शिक्षण घेतलेले व्यक्ती होते व आहेत. त्यांनी अस्पृश्यता निवारण आणि अस्पृश्याना त्यांचे हक्क मिळावेत म्हणून खूप मोठा संघर्ष केला.

त्यांचे काळाराम मंदिर प्रवेश, महाडचा पाण्याचा सत्याग्रह, मनुस्मृतीचे दहन, खोती प्रथेविरुद्धचा संघर्ष, भारतीय राज्यघटना, बौद्ध धर्मांतर, हिंदू कोड बिल, सर्व भारतीयांच्या हक्क आणि अधिकारांसाठी संघर्ष, अशा असंख्य कामांनी भारतीय ब्राह्मणी व्यवस्थेला तडे बसले. आणि ब्राह्मणी व्यवस्था नामशेष होण्याच्या मार्गावर नेवून ठेवली.

लोकशाही : भारतीय संविधानाचे राज्य

भारतीय लोकशाहीचा आधार हे भारतीय संविधान आहे. बाबासाहेबांनी भारतास संविधान ही अनमोल अशी देणगी दिली आहे. यामुळे प्रत्येक व्यक्तीस मताचा अधिकार, सर्व जाती धर्मांना शिक्षण, आरोग्य, रोजगार इ. चे हक्क, संचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, प्रत्येकास मानवी हक्क, स्त्रिया, दलित आणि आदिवासी ना विशेष हक्क, आरक्षण इ. बाबी यामध्ये अंगीकृत झाल्या.

सरकार कोणत्याही पक्षाचे आले तरी त्यास राज्यघटनेची चौकट सोडून काम करता येत नाही. शिवाय मनमानी करता येत नाही. हुकुमशाही निर्माण होवू नये. अशी रचना. इ. बाबी मुळे दिवसेंदिवस दलित, आदिवासी, शुद्र अर्थात ओबीसी, अल्पसंख्य आणि स्त्रियांची स्थिती सुधारत चालली आहे. आणि भारतातील हजारो वर्षापासून पिचलेला, पिडलेला असा तळागाळातील समाज आता प्रगतीच्या मार्गावर वेगवान पणे धावत आहे.

वास्तविक ब्राह्मणांना या देशातील इंग्रजांना हाकलून पेशवाईचे राज्य आणायचे होते. ते महात्मा गांधींमुळे शक्य झाले नाही म्हणून त्यांनी त्यांचा खून केला. आणि भारत स्वतंत्र झाल्या पासून पेशवाईचे राज्य प्रस्थापित व्हावे म्हणून ते धडपडत आहेत.

भीमा कोरेगाव ला बाबासाहेबांची भेट

बाबासाहेब भीमा कोरेगावच्या विजयस्तंभास अभिवादन करण्यास १ जानेवारी या दिवशी नेहमी जात असत. मानसिक दृष्ट्या खचलेल्या आणि दुर्बल बनलेल्या दलितांना शौर्याचे प्रतिक असलेल्या या विजयस्तंभामुळे उर्जा मिळेल असा त्यांचा विश्वास होता. आणि खरोखरच दलितांचे मनोबल उंचावण्यासाठी त्यांनी केलेला हा प्रयोग यशस्वी झाला.

भीमा कोरेगावच्या विजयस्तंभास दरवर्षी मानवंदना

बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवत दर वर्षी १ जानेवारी या दिवशी दलित समाज लाखोंच्या संखेने या विजयस्तंभास अभिवादन करण्यास येत असतो. वर्षानुवर्षे या स्तंभावर गर्दी वाढतच आहे. आता तर बौद्धेतर अन्य मंडळी देखील उदा. दलित, आदिवासी, ओबीसी, शीख, मुस्लीम, ख्रिश्चन इ. लोक या स्तंभांस अभिवादन करण्यास येत असतात.

वढू गाव आणि अॅट्रोसिटी

भीमा कोरेगाव पासून वढू गाव अगदी जवळ आहे. दरवर्षी विजय स्तंभास अभिवादन करण्यास येणारे लोक या वढू गावास देखील भेट देतात. संभाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतात. त्यांना अभिवादन करतात. गोविंद महार (गायकवाड) यांची समाधी देखील त्याच ठिकाणी आहे. या समाधीचे दर्शन घेतात. आणि आपापल्या गावी शांतपणे परत जातात.

२०१७ यावर्षी मात्र इकडे वेगळीच खलबते शिजत होती. मिलिंद एकबोटे आणि मनोहर भिडे यांनी वढू गावात जावून मराठा मुलांची डोकी भडकवली. त्यांनी पंचक्रोशीतील अन्य गावातही जातीवादी विषारी प्रचार केला. आणि २०१७ संपायला ३-४ दिवस बाकी असताना या माथेफिरू तरुणांनी गोविंद महार यांची समाधी तोडली. यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. आणि गुन्ह्यात सहभागी असलेल्या मराठा समाजातील लोकांवर अॅट्रोसिटी अॅक्ट नुसार गुन्हे नोंद झाले. हा बनाव जाणीवपूर्वक रचण्यात आला होता.

त्यामुळे पंचक्रोशीतील मराठा मुलांना अजून भडकविण्यात आले. आणि अभिवादन करण्यास येणाऱ्या दलित बांधवांवर हल्ला करण्याचा प्लॅन ठरविण्यात आला.

भीमा कोरेगाव घटना

दरवर्षीप्रमाणे १ जानेवारी २०१८ रोजी देखील लाखो दलित आणि अन्य फुले आंबेडकरवादी लोक विजय स्तंभास अभिवादन करण्यास सकाळपासूनच येत होते. दरवर्षी पेक्षा या वर्षी गर्दी जास्त होती. कारण इंग्रज विरुद्ध पेशवे या लढाईस यावर्षी २०० वर्षे पूर्ण होणार होते.

अचानक हायवे जवळील इमारतीवरून दगडफेक सुरु झाली. अभिवादन करण्यास येणाऱ्या दलित बांधवांच्या गाड्या जाळण्यात आल्या, फोडण्यात आल्या. हजारो लोक जखमी झाले. एका व्यक्तीचा मृत्यू झाला. हा हल्ला याची जाणीव करून देत होता . की पेशवाईच्या हस्तकांचे मनसुबे अजून संपले नाहीत. त्यांना अजूनही पेशवाईचे राज्य प्रस्थापित करायचे आहे.

महाराष्ट्र बंद

या घटनेचा निषेध म्हणून ३ जानेवारी २०१८ रोजी महाराष्ट्र बंदची हाक प्रकाश आंबेडकर यांनी दिली. आणि हजारो दलित रस्त्यावर उतरले. त्यांनी महाराष्ट्र बंद यशस्वी करून दाखविला.

हजारो दलित युवकांना अटक

या बंद नंतर भीमा कोरेगाव हल्ल्याचे सूत्रधार मिलिंद एकबोटे आणि मनोहर भिडे यांना अटक करणे राहिले दूर. भाजप सरकारने बंदमध्ये सामील झालेल्या  किंवा न झालेल्या निरपराध युवकांना अटक केली. त्यांना मारहाण केली. त्यांच्यावर खोट्या केस टाकल्या. यावर कायदेशीर लढाई सुरु असून अनेक दलित वकिलांनी मोफत केस लढविण्यासाठी पुढाकार घेतला.

मिलिंद एकबोटेला अटक

भीमा कोरेगाव हल्ल्याचे हल्ल्याचे सूत्रधार मिलिंद एकबोटेला सरकारने अटक केली नाही. अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून त्याने हाय कोर्टात, सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. मात्र कोर्टाने याचिका फेटाळल्यावर त्यास अटक करण्यात आली.

मनोहर भिडे अटक करा म्हणून मोर्चा

मनोहर भिडे या हिंदू आतंकवादयास मात्र अद्यापही अटक झालेली नाही. म्हणून प्रकाश आंबेडकरांनी २६ मार्च २०१८ ला मुंबईमध्ये मोर्चाचे आयोजन केले आहे. एल्गार परिषदेत सामील असलेल्या २६० संघटना या मोर्चा मध्येही सामील असणार आहेत. लाखो लोकांना यामध्ये उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ब्राह्मण महारांचा द्वेष का करतात?

आपल्या लक्षात आले असेलच की या घटनाक्रमामध्ये एक शृंखला आहे. आणि ती शृंखला तुकाराम महाराज, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महात्मा गांधी, दाभोलकर, पानसरे यांच्या खुनापासून भीमा कोरेगाव पर्यंत येवून भिडते. स्वातंत्र्य, समता आणि बंधूतेच्या जवळ जाणारे शिवाजीचे राज्य नेस्तनाबूत करण्यासाठी त्यांनी शिवाजी आणि संभाजी राजांचा खून केला. आणि पेशवाईचे मनुस्मृतीवर आधारित राज्य प्रस्थापित केले.

आता संभाजीच्या मृतदेहास अग्नी दिला.  भीमा कोरेगाव लढाईत पेशवाई बुडवली. म्हणून ब्राह्मणांच्या मनात महारांच्या प्रती राग किती खदखदतोय. याची आपणास कल्पना आली असेलच.

गुढीपाडवा: गुढी ऐवजी भगवी पताका हीच खरी संभाजीराजांना मानवंदना

नवबौद्ध समाजाने मराठा समाजास खरा इतिहास समजावून सांगण्याचा आणि ब्राह्मणी षडयंत्राविषयी अनेकदा वेळोवेळी जाणीव करून दिली आहे. मात्र ब्राह्मणी मानसिक गुलामीत मश्गुल मराठा समाजाने त्याकडे दुर्लक्ष केले.

खरा गुढीपाडवा

उशिरा का होईना पण संभाजी महाराजांच्या खुनाचा, मृत्यूचा दिवस ब्राह्मण एवढ्या आनंदात का साजरे करतात? याची मराठ्यांना आता कल्पना येत आहे. शूर वीर संभाजी राजांची बदनामी करण्यात ब्राह्मण लेखक, वक्ते, अभ्यासक पुढे का आहेत? याचीही मराठ्यांना आता कल्पना येत आहे. आणि त्यामुळे श्रीमंत कोकाटे यांनी केलेल्या आवाहनाकडे मराठा आणि १८ पगड जाती गांभीर्यपूर्वक पहात आहेत. आणि खरा गुढीपाडवा  साजरा करत आहेत.

यावर्षी साडी, बांबू, आणि उलट्या तांब्याच्या गुढीस मराठी जनतेने मूठमाती दिली. आणि त्याऐवजी संभाजी महाराजांना अभिवादन करत भगव्या पताका घरांवर फडकाविल्या. या पताका जणू शिवाजीचे राज्य अजूनही आमच्या मनात घर करून आहे. याची साक्ष देत आहेत. आणि ब्राह्मणांना जणू संदेश देत आहेत. की  आता तुमची सोबत आम्ही धरणार नाही. आणि राजा संभाजीची साथ कधी सोडणार नाही. गुढीपाडवा दिवशी आम्ही साडी टांगणार नाही.

मराठा बौद्ध एकजूट

गुढीपाडवा: शिवशाही ते लोकशाही या विषयी आपल्या आता लक्षात आले असेलच. शेवटी मनोहर भिडे आणि मिलिंद एकबोटे यांचे आभार मानावेसे वाटतात. कारण त्यांनी मराठा आणि दलित असे भांडण लावण्याचा प्रयत्न केला खरा. काही अंशी यशस्वीही झाला. पण यामुळे संभाजी महाराज, गोविंद महार, भीमा कोरेगावची महार बटालियनची लढाई, पेशवाई आणि इंग्रज यांचा इतिहास महाराष्ट्रातील गावागावात, कानाकोपऱ्यात आणि तळागाळात आपसूकच पोहोचला. आणि त्यामुळे हा बदल घडविण्याची मानसिकता निर्माण झाली. आणि मला आशा वाटते की भविष्यात मराठा बौद्ध अशी एकजूट निर्माण होईल. आणि महाराष्ट्रातील गुढीपाडवा आणि या ब्राह्मणी प्रवृत्ती कायमच्या नेस्तनाबूत होतील.

Image source : https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0:Gudi_Padwa_Gudi.PNG

गुढीपाडवा: शिवशाही ते लोकशाही
लेखक :

सचिन मोरे

संस्थापक :

ह्युमन लिबर्टी

About the author

Sachin More

Hi,
I am Sachin More
President of Human Liberty Organization
Blogger at http://humanliberty.co.in/
YouTube Creator at Human Liberty Channel

View all posts

2 Comments

  • सचिनजी,
    खूप अभ्यास करून, संदर्भ नमूद करून लेखन केले आहे. महत्त्वाचे म्हणजे स्वतः चे भाष्य निर्भीडपणे मांडले आहे. बहुजन समाजातील मानसिक गुलामगिरी दूर होते आहे आणि समाजाला स्वाभिमान जपत घटनेने दिलेल्या हक्क ,अधिकारांचा उपभोग आता कुठे घेता येऊ लागला आहे तो केवळ तुमच्यासारख्या प्रबोधन करणाऱ्या लेखक/वक्ते यांनी केलेल्या दिशादर्शनामुळे! अशीच जागृती करीत रहा. जय जिजाऊ!जय शिवराय!!जय भीम!!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *