हिजडा छक्का छिनाल रांड

हिजडा छक्का छिनाल रांड या शिव्या योग्य आहेत का?

हिजडा छक्का छिनाल रांड या शिव्या योग्य आहेत का?

खरेच हिजडा छक्का छिनाल रांड या शिव्या योग्य आहेत का? हिजडे किंवा छिनाल स्त्रिया या दुष्ट, कपटी असतात का? जर नसतात तर दुष्टांना उद्देशून हे शब्द वापरणे, म्हणजे हिजडे आणि वैश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांचा अपमान नव्हे काय?  समाजामध्ये दुष्ट, कपटी, गुन्हेगार, वाईट प्रवृत्तीच्या व्यक्तींना उद्देशून असे शब्द प्रयोग केले जातात. बऱ्याचदा शोषित, दलित घटकातील व्यक्ती ही जेंव्हा राग अनावर झाल्यावर शोषक वर्गाला उद्देशून असे शब्द प्रयोग करतात तेंव्हा फार दु:ख होते.

खरेतर या व्यक्तींनी स्वत:च्या व्यक्तिस्वातंत्र्याची जपणूक करण्यासाठी सर्वात जास्त किंमत मोजलेली असते. त्यांचे जीवन आणि आणि केलेला त्याग, भोगलेल्या यातना पाहिल्या की मुख्य वर्गातील आपण लोक प्रथा, परंपरा, समाज यांचा विचार करत बसून आपले आयुष्य एका मानसिक गुलामीत घालवतो. त्यावेळी जाणवते. पोरे जन्माला घातली म्हणजे कोणी मर्द होत नाही. आणि हातात बांगड्या भरल्या म्हणून कोणी नामर्द होत नाही. त्यासाठी अंगात धमक लागते. घर, कुटुंब, समाज यांची गुलामी झुगारून स्वत:ला हवे तसे जगण्यासाठी तेवढा दम लागतो. तेवढे मानसिक बळ लागते. की जे सामान्य माणसांमध्ये नसल्यामुळे ते गुलामी आणि लाचारीचे जीवन जगत आयुष्य घालवतात. पण बंड करत नाहीत. मला हिजडा आणि छिनाल हे शब्द बंडाचे प्रतिक वाटतात. कसे ते पाहू.

हिजडा छक्का छिनाल रांड या शिव्या योग्य आहेत का?
हिजडा / छक्का –

कोणत्याही समाजातील किमान 4 % लोक हे समलैंगिक असतात. त्यापैकी बहुसंख्य लोकांना भिन्नलिंगी आकर्षण असत नाही.किंवा काही जण द्विलिंगी आकर्षण असणारे असतात. या देशात परजातीय भिन्नलिंगी व्यक्तीशी विवाह करण्याचेच स्वातंत्र समाज देत नाही तर आवडलेल्या, प्रेम करत असलेल्या समलिंगी व्यक्तीशी विवाह करण्याचे स्वातंत्र्य मिळणे कसे शक्य आहे?  त्यामुळे अनेक समलिंगी स्त्री पुरुष आपली समलिंगी असलेली ओळख समाजा पासून लपवून भिन्न लिंगी व्यक्तीशी लग्न करतात आणि मुकाट पणे संसार करतात. जोडीदार आवडत नसला तरी त्याच्या सोबत आयुष्य घालवतात. मला या व्यक्ती घाबरट, मानसिक गुलाम आणि नामर्द वाटतात.

त्यापेक्षा ज्या पुरुषांना असे जाणवते की आपण मानसिक रित्या स्त्री आहोत आणि आपणास स्त्रीबद्दल आकर्षण वाटत नसून पुरुषांबद्दल वाटते. एव्हाना स्त्रियांचा पेहेराव करणे आवडते. ते पुरुष कुणाचीही पर्वा न करता जेंव्हा हिजडा बनतात, तेंव्हा स्वत:चे आई वडील त्यांना घरातून हाकलून देतात. भाऊ बहिण, नातेवाईक, मित्र नाते तोडून टाकतात. तरीही न डगमगता, कशाचीही तमा न बाळगता जी व्यक्ती हिजडा बनते त्या व्यक्तीमध्ये हिम्मत लागते. येड्या गबाळ्याचे ते काम नव्हे. नामर्दाचे तर बिलकुल नव्हे. जी व्यक्ती आपल्या व्यक्तिस्वातंत्र्या साठी एवढा त्याग करते तिला आपण एका झटक्यात शोषक वर्गाला नीचत्व दर्शवण्यासाठी हिजडा किंवा छक्का म्हणून शिवी घालतो तेंव्हा प्रश्न पडतो. हिजडा ही व्यक्ती शोषक आहे का? त्रासदायक आहे का? नैतिकदृष्ट्या नीच आहे का? जी व्यक्ती आपल्या स्वत:च्या व्यक्तीस्वातंत्र्यासाठी समाजासोबत आयुष्य भर झगडते, अन्याय, अपमान, अवहेलना आयुष्यभर सहन करते ती  व्यक्ती खरेतर समतेचाच लढा आयुष्यभर लढत असते. स्वातंत्र्य, समता आणि आत्मसन्मान, स्वाभिमान यासाठी झटणारी ही व्यक्ती  आपणास आपल्या लढ्यातीलच एक शिलेदार आहे असे नाही का वाटत? आपण मात्र स्वत: या व्यक्तींची विटंबना होत असताना नुसते पाहतच  बसत नाही तर त्या व्यक्तीच्या स्वातंत्र्य, समता आणि आत्मसन्मान पायदळी तुडवत आहोत. आपणही त्याच शोषक घटकांपैकी आहोत की जे स्वत: शिवाय दुसऱ्या माणसाची पर्वा करत नसून त्यांना माणूस म्हणून जीवन जगणे नाकारत आले आहेत.

छिनाल / रांड

छिनाल आणि रांड हा देखील असाच एक शब्द. स्वातंत्र, समता आणि आत्मसन्मान हा ना विवाहित स्त्रियांना मिळतो ना वैश्यांना.

पूर्वीपासून जगभर उत्पन्नाचे साधन स्त्री पासून पुरुषाने हिरावून घेतल्यामुळे स्त्री जगण्यासाठी संपूर्णपणे पुरुषावर अवलंबून राहू लागली. काही पर्यायाच नव्हता.

ज्या स्त्रियांनी एकाच पुरुषाची गुलामी स्वीकारली तिला आयुष्यभर एकनिष्ठ राहून एकाच पुरुषासोबत शय्या सोबत करण्याच्या बदल्यात आयुष्यभर उपजीविका, संरक्षण आणि तिच्या मुलांचे संगोपन या बाबी त्याच्या कडून मिळाल्या. हा एक प्रकारचा कराराच आहे.

तर दुसऱ्या बाजूला त्या त्या वेळी शय्या सोबत करण्याच्या बदल्यात त्याचा मोबदला म्हणून त्या त्या वेळी छिनाल किंवा रांड स्त्रियांना पैसे मिळू लागले. त्यातूनच त्यांची उपजीविका चालत असे आणि त्या त्यांच्या मुलांचे संगोपन स्वकमाईतून करत असतात. हे सर्व आज पर्यंत अबाधित चालू आहे.

खरेतर विवाहित स्त्रीला मरेपर्यंत उपजीविकेची चिंता नव्हती मात्र त्या बदल्यात गुलामी भोगावी लागली. तर दुसरीकडे रांड किवा छिनाल स्त्रियांना म्हातारपणाची चिंता होती पण त्या स्वतंत्र जीवन जगत  होत्या. समाजाने त्यांचा अपमान केला, त्यांना हिणवले, छी थू केली तरीही त्यांनी कुणाचीही गुलामी स्वीकारली नाही.

हिजडा छक्का छिनाल रांड या शिव्या योग्य आहेत का?

डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र मजूर पक्षाच्या जाहिरनाम्या मध्ये सामान्य वर्गाच्या कामगारांना म्हणतात तुम्हाला काहीही अधिकार नाही स्वत:च्या हक्कांसाठी झगडण्याचा जर तुम्ही स्वत: दलित वर्ग कामगारांचे हक्क पायदळी तुडवत असाल तर.त्याच धर्तीवर मला या ठिकाणी म्हणावेसे वाटते

रांड, छिनाल, छक्का आणि हिजडा स्वत:च्या आत्मसन्मानासाठी, व्यक्तीस्वातंत्र्यासाठी समते साठी आयुष्यभर झगडत आलेले आहेत. आपणास काहीही अधिकार नाही स्वत:च्या हक्क आणि अधिकारांसाठी लढण्याचा जर आपण छिनाल आणि हिजड्यांचे हक्क आणि अधिकार पायदळी तुडवत असलो तर.

हिजडा छक्का छिनाल रांड या शिव्या योग्य आहेत का?
लेखक :

सचिन मोरे

संस्थापक :

ह्युमन लिबर्टी

 

About the author

Sachin More

Hi,
I am Sachin More
President of Human Liberty Organization
Blogger at http://humanliberty.co.in/
YouTube Creator at Human Liberty Channel

View all posts

2 Comments

 • Sachin More Sir There is an problem with your Article Bcz you also using the Same abusing words to them u can call them prostitute or sex worker insted using of Chinal & Rand #### Again Your seting a mind set of people they are only a chinal and Rand

  • Dear Deepakji,
   Please read carefully. I didn’t any abusing word. I just explain about their business. And compare their business with married woman.

   I just trying to say that married woman also doing same business. Married women committed with only one person. But after that she become his slave.

   But Chinal or Rand is not slave of anybody. She doing her business / work and get salary or payment. But in our society Chinal doesn’t have any option to do any other business because their is no any property or economical right for her. So she is victim of society. Because society every time abuse her with Rand and Chinal words. So its a discrimination or atrocity. Society should rehabilitate her properly. Once she self depend she will refuse to sex work for money. And she will enjoy her sex life without exploitation.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *