हिंदू मुस्लीम दंगल

हिंदू मुस्लीम दंगल आणि भारतीय राजकारण

हिंदू मुस्लीम दंगल आणि भारतीय राजकारण

बिहार, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तरप्रदेश, गुजरात ही राज्ये हिंदू मुस्लीम दंगल साठी तशी संवेदनशील. या ठिकाणी रामनवमीचे निमित्त साधून ब्राह्मणवाद्यांनी दंगली पेटवल्या. खरेतर या दंगली नव्हेतच. हे आहेत ब्राह्मण्यग्रस्त हिंदूनी मुस्लिमांवर केलेले हल्ले. बिहार मधील ६ जिल्हे या आगीत अक्षरश: धुमसत आहेत. मुस्लिमांचे मदरसे, मस्जिदी, घरे आणि दुकाने यांच्यावर हल्ले होत होते. गरज नसताना मुद्दाम मुस्लीम वस्तीतून रॅली काढण्यात आल्या. तिकडे जय श्रीराम च्या घोषणा देण्यात आल्या. हातातील दगड दिसतील त्या मुस्लीम घरांवर आणि मस्जिदींवर भिरकावण्यात आले. मस्जिदीवर चढून भोंगे हटवण्यात आले. तिथे हिरवे झेंडे हटवून भगवे झेंडे फडकविण्यात आले. उन्माद इतका की मुस्लिमांच्या कब्रस्तानांवर देखील भगवे झेंडे फडकविण्यात आले.

हिंदू मुस्लीम दंगल : दहशतीचे राजकारण

हा उन्माद आजचा नाही तर कित्येक दिवस आधी पासून याची तयारी सुरु होती. गाईचे मांस (बीफ) वर बंदी आणल्या दिवसापासून एव्हाना त्याही पूर्वीपासून हिंदू मुस्लीम दंगली पेटविण्याचे मनसुबे रचले गेले होते. एकट्या दुकट्या मुस्लीम वृद्ध व्यक्तीला जबरदस्तीने जय श्रीराम म्हणावयास लावणे, त्यासाठी मारहाण करणे आणि आई बहिणीवरून अर्वाच्य शिव्या देणे या स्वरूपाचे निरनिराळे व्हिडीओ सोशल मिडीयावर कित्येक दिवसांपासून प्रदर्शित होत आहेत.

अगदी काही महिन्यांपूर्वीच लव जिहाद च्या नावाखाली एका मुस्लीम व्यक्तीस ठेचून, जाळून मारण्यात आले होते. मार खाणारी व्यक्ती, मार देणारी व्यक्ती दिसत असलेल्या या व्हिडीओचे चित्रीकरण एका अल्पवयीन मुलाने करून तो व्हिडीओ मुस्लिमांमध्ये दहशत पसरविण्यासाठी सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आला होता.

मॉब लिंचींग

एका बसवर मुस्लीम झेंडा लावला होता. या झेंड्याला पाकिस्तानचा झेंडा ठरवून त्या बसला अडविण्यात आले. आणि म्हाताऱ्या मुस्लीम व्यक्तीस पाकिस्तान मुर्दाबादचे नारे द्यायला लावून तो झेंडा त्याच्याच पायदळी जबरदस्ती तुडविण्यास भाग पाडले.

तर दुसऱ्या एका मुस्लीम व्यक्तीस झाडाला बांधून जय श्रीराम म्हणण्यास जबरदस्ती करण्यात आले. आणि जय श्रीराम म्हणे पर्यंत, वारंवार म्हणेपर्यंत चाबकाचे फटके देण्यात आले. या आणि अशा कित्येक घटनांचे व्हिडीओ बनवून सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आले. मुस्लीम समाजामध्ये दहशत निर्माण केली गेली. इतकेच नव्हे तर ब्राह्मण्यग्रस्त धर्मांध गर्दीने अनेक मुस्लिमांना ठेचून मारले, जिवंत जाळले आहे.

मुस्लीम विरोधी खोटा प्रचार

या सर्व घटनांना मूर्त स्वरूप आणण्यासाठी मोठा बनाव करण्यात येतो. मुस्लीम लोक हिंदूची घरे पाडत आहेत. असे खोटे व्हिडीओ बनविण्यात येतात. वारंवार ते प्रदर्शित करण्यात येतात. मंदिर वही बनायेंगे साठीही मोठा प्रचार करण्यात येतो. आणि रामाचे मंदिर मुस्लिमांनी ताब्यात घेवून त्या जागेवर कशी बाबरी मस्जिद बनवली हे पसरविले जाते.

शिवाजी महाराज नसते तर सगळ्यांची सुंता झाली असती असा प्रचार केला जातो. शिवाजी च्या नावे खोटा इतिहास रचला जातो. आणि शिवाजीचा वापर करून हिंदू मुस्लीम दंगली पेटविण्याचा प्रयत्न करण्यात येतो. महाराष्ट्रात मनोहर उर्फ संभाजी भिडे हा ब्राह्मण व्यक्ती हे कार्य करत आहे. आणि बहुजन हिंदू तरुणांची डोकी भडकवत आहे. बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, आर एस एस या संघटना मुस्लीम विरोधी प्रचारात पुढे आहेत.

गुजरात पॅटर्ण आता भारतभर

गुजरात पॅटर्ण आता सगळ्यांना माहित आहे. याच पॅटर्णची अमलबजावणी संपूर्ण भारतभर करण्याचा डाव भाजप सरकार करत आहे. गुजरात मध्ये मुस्लिमांच्या वस्त्यांवर हल्ले झाले, मुस्लीम तरुणांचे खून करण्यात आले. त्यांच्या घरांची तोडफोड करून आगी लावण्यात आल्या. मुस्लीम महिलांवर बलात्कार करण्यात आले. आणि गुजरातमध्ये हे दंगे करणाऱ्या, हल्ले करणाऱ्या ब्राह्मणवादी हिंदुना त्यावेळच्या नरेंद्र मोदी सरकारकडून पोलिसी संरक्षण दिले गेले. आता त्याच धर्तीवर देशात ठिकठीकाणी असे हल्ले आणि दंगे घडवून आणले जात आहेत. यामध्ये अनेक राज्यांची अक्षरश: राख रांगोळी होत आहे.

हल्ल्या मागील राजकीय कारणे

हे असे हल्ले करण्यामागे राजकीय कारणे आहेत. एकतर हिंदुना आणि मुसलमानांना सतत दहशतीमध्ये ठेवायचे. कोणत्यातरी एका अदृश्य भीतीने त्यांना भयभीत करायचे. हिंदू खतरेमे किंवा मुस्लीम खतरेमे. यामुळे लोक धर्माच्या नावाने संघटीत होऊ लागतात. आणि भडक भाषणे करणाऱ्यांच्या मागे उभे राहतात.

या पाठींब्यातून मिळणाऱ्या लोकसहभागातून दंगली पेटवायच्या. म्हणजे मग लोकांचे जीवनमरणाच्या प्रश्नाकडे लक्ष राहत नाही. त्यामुळे मग महागाई, बेरोजगारी, गरिबी, शिक्षण आणि आरोग्याची दुरवस्था, सोई सुविधांचा अभाव, कमी केलेले किंवा काढून घेतलेले अधिकार, बंद केलेल्या योजना, सत्ताधाऱ्यांनी केलेला प्रचंड भ्रष्टाचार, लोकांच्या कष्टाच्या पैशाची केलेली नासाडी, वाढविलेले कर, आणि जुलमी कायदे यांच्याकडे जनता दुर्लक्ष करते. आणि सत्ताधाऱ्यांना सत्तेचा दुरुपयोग करताना त्याचा लाभ होतो.

निवडणुकीचे राजकारण

अशा प्रकारे एकदा जनतेला धर्मांध बनविल्यावर जनता धर्माच्या नावाने राजकारण करणाऱ्यानाच मत देते आणि सत्तेवर बसवते.

या दंग्यामागे उघडपणे २०१९ चे राजकारण आहे. २०१९ मध्ये होणाऱ्या निवडणुका जिंकता याव्यात आणि आज पर्यंत साडे चार वर्ष केलेली पापे झाकली जावीत यासाठीचा हा अट्टाहास आहे.

सम्राट अशोकापासूनचे ब्राह्मणी राजकारण

हिंदू मुस्लीम प्रश्नामागील ऐतिहासिक बाजूदेखील आपण समजून घेवूयात. सम्राट अशोकाने या देशात क्रांती केली होती. भारत, पाकिस्तान, बांग्लादेश, नेपाळ, भूतान, अफगाणिस्तान, म्यानमार, इराण, ताजिकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान या एवढ्या मोठ्या भूप्रदेशावर त्याचे राज्य होते. आपले राज्यच नव्हे तर संपर्ण विश्व बौद्धमय करण्यासाठी त्यांनी फार मोठे प्रयत्न केले. त्याकाळात अशोक राजवटीतील सारा प्रदेश हा बौद्ध होता. आणि या देशात स्वातंत्र्य, समता, बंधुतेवर आधारित राजवट होती. भारतीय राज्यघटना सम्राट अशोकाच्या राजवटीशी मेळ खाणारी आहे.

सम्राट अशोकाचा नातू बृहद्रथ याचा खून त्याचाच सेनापती पुष्यमित्र श्रुंग (ब्राह्मण) याने केला आणि अशोकाची सर्व राजवट ताब्यात घेवून त्याने प्रतिक्रांती केली. बौद्ध भिक्खुंच्या कत्तली केल्या. आणि सर्व बौद्ध लोकांना ब्राह्मणी धर्मात समाविष्ट करून त्यांना गुलाम बनविले.

मुस्लीम : ब्राह्मणी जुलमी सत्तेला खिंडार पाडले

त्यांचे मनसुबे आणि सत्तेला मुस्लिमांनी खिंडार पाडले. आणि श्रुंगाची जुलमी राजवट नेस्तनाबूत झाली. त्यानंतर ब्राह्मणी राजवटीला त्रासलेल्या जनतेने मग मोठ्या प्रमाणात मुस्लीम धर्मांतर केले. आणि ब्राह्मणी अत्याचार आणि गुलामीतून स्वत:ची सुटका करून घेतली.

सत्तेनी पछाडलेले पुष्यमित्र श्रुंगाचे वारसदार (ब्राह्मण) सातत्याने श्रुंगाची राजवट पुन:प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठीच त्यांनी शिवाजी आणि संभाजीचा खून करून महाराष्ट्रात पेशवाईचे राज्य आणले. त्यानंतर इंग्रज आले आणि त्यांनी पेशवाई उलथवली. आता स्वतंत्र भारत राष्ट्र निर्माण झाले आहे.

ब्राह्मणांच्या मनातील भारत गांधीमुळे निर्माण होऊ शकला नाही. म्हणूनच त्यांनी गांधींचा खून केला. पुष्यमित्र श्रुंगाची राजवट किंवा पेशवाईची राजवट पुन:प्रस्थापित करण्याचे ब्राह्मणांचे मनसुबे अजूनही कायम आहेत.

हिंदू मुस्लीम दंगल : कोण? का? कशासाठी?

या देशातील पूर्वाश्रमीची बौद्ध जनता श्रुंगाने हिंदू म्हणजेच शुद्र अतिशूद्र अर्थात गुलाम करून घेतली. त्यांना आपला खरा इतिहास माहित होऊ नये म्हणून त्यांना शिक्षण नाकारले. आणि रामायण, महाभारत, पुराणे इ. भाकडकथा रचून लोकांना त्यांच्या खऱ्या इतिहासापासून परावृत्त केले. आणि काल्पनिक कथांमध्ये गुंतवून ठेवले. त्यामुळे या मानसिक गुलाम जनतेला आपला मुख्य शत्रू कोण हेच समाजत नाही.

ब्राह्मण त्यांना मुस्लीम हे हिंदूचे शत्रू आहेत असे भासवतात. आणि मानसिक गुलाम हिंदू जनता तेच खरे मानून मुस्लिमांशी लढत राहते. वास्तविक हिंदुवर राज्य करणे ब्राह्मणांना फार सोपे आहे. या देशातील बहुसंख्य जनता हिंदू आहे. ती सहज गुलाम बनू शकते. आधीच तिने मानसिक गुलामी स्वीकारली आहे.

मुस्लीम : ब्राह्मणांचा मानसिक गुलाम बनणार नाही.

हिंदू जरी संख्येनी मोठ्या प्रमाणात असले तरी पाकिस्तान आणि बांग्लादेश निर्माण होऊनही स्वतंत्र भारतात मुस्लिमांची संख्याही प्रचंड आहे. आणि भारत पुन्हा ब्राह्मणांच्या ताब्यात येण्यासाठी त्यांच्यापुढे सर्वात मोठा अडथळा हा मुस्लीम समुदाय आहे. कारण काही झाले तरी हा समाज आपला धर्म सोडणार नाही. आणि ब्राह्मणांचा मानसिक गुलाम बनणार नाही. हा समाज स्वतंत्रपणे आपल्या हक्क आणि अधिकारांसाठी संघर्ष करत राहील. आणि ब्राह्मणी राजवट उलथवल्याशिवाय राहणार नाही. अगदीच नाही जमले तर ब्राह्मणांच्या नाकी नऊ आणल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मुस्लिमांचे शारीरिक, मानसिक, आर्थिक सर्व बाबतीत खच्चीकरण करण्याचे ब्राह्मणांचे मनसुबे आहेत.

दुय्यम नागरिकत्वाचे मनसुबे का?

आपण हे लक्षात घेवूयात की, प्रतिक्रांती झाल्या नंतरही बौद्ध धर्म न सोडणारे आणि ब्राह्मणी धर्म न स्वीकारणारे गाव कुसाबाहेराचे लोक, की जे एकेकाळी गावाचे संरक्षणकर्ते म्हणून मान्यताप्राप्त होते. त्यांचे खच्चीकरण श्रुंगाने आणि पेशव्यांनी त्यांच्यावर अस्पृश्यता लादून केले. कदाचित असेच काहीसे त्यांना करायचे आहे. मुस्लिमांना दुय्यम नागरिकत्व देण्याचे मनसुबे ते अधून मधून बोलूनही दाखवतात.

हिंदू मुस्लीम दंगल आणि मुस्लिमांचे सामंजस्य

सुरुवातीच्या काळात म्हणजे मुंबई दंगलीच्या पूर्वी मुस्लीम समाज जशास तसे उत्तर देत असे. हिंदुनी मुस्लिमांवर हल्ले केले की मुस्लीम ही हिंदुंवर प्रतिहल्ले करत असत. मात्र आता हळूहळू त्यांच्या हे लक्षात येऊ लागले आहे. की हिंदू अर्थात शुद्र (एस सी, एस टी, ओबीसी) हे ब्राह्मणांचे गुलाम आहेत. आणि ब्राह्मण हे त्यांचे अतोनात शोषण हजारो वर्षापासून करत आहेत. या हिंदुना मुस्लिमांविरुद्ध भडकविण्याचे काम ब्राह्मण लोक करत आहेत. यात त्यांचे दुष्ट राजकीय मनसुबे दडलेले आहेत. त्यामुळे जरी हल्ले झाले तरी प्रतिहल्ले करण्यात मुस्लीम समाज पुढे येत नाही. याउलट अतिशय समंजस आणि प्रगल्भ भूमिका मुस्लीम समाज दिवसेंदिवस घेत असल्याचे दिसून येते.

शांततेचे आवाहन

याचे अत्यंत ठळक आणि ताजे उदाहरण म्हणजे हिंदू मुस्लीम दंगल मध्ये स्वत:चा मुलगा मारला गेला असतानाही आसनसोल (पश्चिम बंगाल) चे इमाम इमादादुल रशिदी हे लोकांना शांत राहण्याचे आवाहन करतात. आणि बदला घेण्याचा कोणी प्रयत्न केला तर आसनसोन सोडून जाण्याचा इशारा मुस्लीम जनतेला देतात.

मुस्लीम समाज आणि दानधर्म

ठिकठीकाणी धर्मादाय आणि दानधर्माचे काम करण्यात मुस्लीम समाज पुढे येत आहे. हिरीरीने भाग घेत आहे. पोलीस भरतीला आलेल्या युवकांना रहाण्या जेवणाची, संडास बाथरूमची, चहा नाष्ट्याची आणि संरक्षणाची जबाबदारी त्यांनी ठाण्यातील मदरशांमध्ये केली. तर शेतकरी मोर्चा असो किंवा अन्य कोणताही समाजउपयोगी कार्यक्रम. लोकांना पाणी, चहा, नाश्ता, जेवण, फळे इ. पुरविण्यात मुस्लीम समाज पुढाकार घेत आहे. शेतकरी मोर्चा असो, किंवा भीमा कोरेगावचे अभिवादन असो, किंवा आझादमैदानावरील मनोहर भिडेला अटक करण्यासाठी आलेला मोर्चा असो. यामध्ये मुस्लिमांनी आपला सहभाग नोंदवला.

मुस्लिमांनी ओळखलाय आपला खरा शत्रू आणि खरा मित्र

मुस्लीम समाजाच्या या सामुहिक वर्तनातून त्यांनी दाखवून दिलेय की, हिंदू आमच्याशी कसेही वागले तरी आमचा खरा शत्रू कोण आणि खरा मित्र कोण हे आम्ही ओळखलंय. आशा करूयात मुस्लिमांप्रमाणेच हिंदू देखील आपला खरा शत्रू कोण आणि खरा मित्र कोण हे लवकरच ओळखतील. ब्राह्मणी गुलामीतून लवकरात लवकर बाहेर पडतील. आणि हिंदू मुस्लीम दंगल कायमची संपुष्टात येईल.

हिंदू मुस्लीम दंगल आणि भारतीय राजकारण
लेखक :

सचिन मोरे

संस्थापक :

ह्युमन लिबर्टी

 

About the author

Sachin More

Hi,
I am Sachin More
President of Human Liberty Organization
Blogger at http://humanliberty.co.in/
YouTube Creator at Human Liberty Channel

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *