जातीअंत

जातीअंत उपाय – समाजासाठी आवश्यक

जातीअंत उपाय – समाजासाठी आवश्यक

जातीअंत करण्याचा प्रयत्न जसा शासनाने करायला हवा. सामाजिक संस्था, संघटनांनी करायला हवा. तसाच समाजातील व्यक्तीनीही करायला हवा. या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातूनच कायमचा जातीअंत होवू शकतो.

शिक्षण

बाबासाहेब म्हणाले होते. शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे. जो पिईल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही. हे अगदी खरे आहे. शिक्षणामुळे विकासाची अनेक दारे आपल्यासाठी खुली होतात. आणि त्या द्वारे प्रवेश करून आपण आपला विकास करू शकतो. यासाठी सर्व समाजाने जीवाची बाजी लावून स्वत: शिकले पाहिजे. आणि आपली पोरे शिकविली पाहिजेत. शिकल्यानंतरच मागास वर्गीय लोक उच्च वर्गीय लोकांच्या बरोबरीला येण्यास मदत होणार आहे.

माऱ्याच्या आणि मोक्याच्या जागा ताब्यात घ्या.

बाबासाहेबांनी मागासवर्गीय समाजास माऱ्याच्या आणि मोक्याच्या जागा ताब्यात घेण्याचा सल्ला दिला आहे. जर आपण या जागा ताब्यात घेतल्या तरच आपण आपला उद्धार करू शकतो. तसेच आपले नुकसान होण्या पासून आपण स्वत:ला वाचवू शकतो. आणि आपण आपला आर्थिक आणि सामाजिक दर्जा वाढवू शकतो. त्यामुळे अन्य जातींमध्ये मिसळून जाणे सोपे होवून जाते.

यासाठी शिक्षण घेवून मोठ्या अधिकारी पदांवर आपणास जावून बसावे लागेल. आजही वरिष्ठ अधिकारी, न्यायाधीश, मुख्य प्रवाहातील मिडिया, मुख्य प्रवाहातील राजकीय पक्ष या ठिकाणी ब्राह्मण लोक जागा अडवून बसलेले आहेत. आणि त्या ठिकाणावरून मनुस्मृतीची अंमलबजावणी ते करत आहेत. यासाठी मागास घटकाने त्या जागा ताब्यात घेवून ब्राह्मणांचे षडयंत्र उधळून लावायला हवे.

स्वजातीच्या परंपरागत व्यवसायाचा त्याग

बाबासाहेब म्हणाले होते की, जात म्हणजे एक बंदिस्थ वर्ग आहे. कारण मनुष्य ज्या जातीत जन्मास येतो. त्याच जातीचा व्यवसाय तो परंपरागत रित्या करत राहतो. आणि त्याच्या वर्गानुसारच त्यांची ओळख होते. शिवाय त्यानुसारच त्यांचा सामाजीक, आर्थिक, राजकीय, धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात दर्जा ठरत असतो. न्हावी, शिंपी, चांभार, कुंभार, सुतार, लोहार, माळी, कुणबी, मांग, ब्राह्मण यांचे प्रत्येकाचे व्यवसाय निश्चित आहेत. त्यानुसार त्यांना मिळणारी वागणूक व आर्थिक स्थिती आधारीत आहे.

महार जातीने मात्र आपला परंपरागत व्यवसाय त्यागला आहे. त्यामुळे ही जात वर्गातून मुक्त झाली आहे. या आधारावर विचार करता व्यक्तींनी स्वजातीच्या व्यवसायाचा त्याग करणे. अन्य कोणतेही व्यवसाय स्विकारणे. ते शिकून घेणे आवश्यक आहे. कारण यामुळे आपण जातीला वर्गातून मुक्त करतो. जाती व्यवस्थेला सुरुंग लावण्यासाठी स्वजातीच्या परंपरागत व्यवसायाचा त्याग करणे ही अत्यंत महत्वाची बाब आहे.

गावाचा त्याग अर्थात शहराकडे चला

गाव म्हणजे १२ बलुतेदार, १८ आलुतेदार. जातीनिहाय परंपरागत वस्त्या. त्यानुसार असणारे परस्पर असामंजस्य. खोट्या प्रतिष्टा व जाती आधारीत मान सन्मान व अपमान. उचनिचता, सरंजामी प्रवृत्ती, अहगंड व न्यूनगंड इ. बाबी या गावाचे वैशिष्ट्य आहेत. जात आणि गाव हे परस्परांशी एकनिष्ठ व एकरूप आहे.

याउलट शहरातील वस्त्या ह्या मिश्र वसाहती असतात. उत्पन्नाच्या अनेक संधी व अनेक व्यवसाय उपलब्ध असतात. लोकसंख्या जास्त असल्यामुळे कोणता व्यक्ती कोणत्या जातीचा आहे. याची विचारपूस करून व्यवहार करण्याची गरज उरत नाही. शिक्षणाच्या संधीमुळे मागास समजुती पुसण्यास मदत होते. शिक्षण, आरोग्य, वाहतुकीच्या सुविधा, संपर्क इ. बाबींमुळे माणूस अधिक आधुनिक आणि प्रगत जीवन जगू लागतो.

धनदांडग्या जातींची हुकूमशाही व प्रभाव शहरात क्षीण होतो. जातदांडग्याची भाडभीड न ठेवता स्वतंत्र मनाने निर्णय घेता येतात. गावातील अल्पसंख्य जातीस, मागास जातीस शहरात संरक्षण भेटते. या बाबींचा विचार करता गाव सोडून शहराकडे स्थलांतरीत होण्यास जातीअंत च्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे.

इतकेच नव्हे तर आंतरजातीय विवाहास देखील गावांप्रमाणे शहरात कडवा विरोध होत नाही. एकूणच जाती अंतास पोषक वातावरण शहरात लाभते. त्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देखील शहराकडे चला हा नारा दिला होता.

आडनावाचा त्याग

बऱ्याच वेळा आडनावांवरुन व्यक्तीची जात चटकन समजते. कित्येकांचे नाव सांगूनही समाधान होत नाही. आडनाव, गाव इ. विचारुन जातीचा अंदाज लावला जातो. सदर व्यक्तीशी कसे वागायचे हे त्यानंतर ठरविण्यात येते. त्यामुळे आडनावांचा त्याग केल्यास जात कळणे. व त्यानुसार होणारा भेदभाव टाळता येवू शकतो.

माणूस म्हणून व्यक्तीशी व्यवहार होणे अतिशय महत्वपूर्ण आहे. माणूस कोणत्याही जाती, धर्माचा, विचारांचा असला तरी त्यास माणूस म्हणून वागणूक मिळत असेल तर जातीअंत ला  पूरक वातावरण निर्माण होते.

आंतरजातीय विवाह

आंतरजातीय विवाहांमुळे केवळ २ व्यक्तीच नव्हे तर दोन कुटूंब त्यापुढे जावून २ जाती एकत्र येतात. परस्परांमधील द्वेष, तेढ, स्पर्धा, तिरस्कार संपुष्टात येवू शकतात. प्रेमच जातीय द्वेषाला सडेतोड उत्तर आहे.

शहरातील शैक्षणिक सुविधा आणि रोजगाराच्या संधीमुळे नवी आंतरजातीय प्रेमप्रकरणे उभी राहतात. मात्र त्यास विवाहांचे स्वरूप येत नाही. यामागे कुटुंबीय, नातेवाईक, मित्र परिवार, ग्रामस्थांचा विरोध कारणीभूत असतो. घरातून हाकलून देण्यापासून खून करण्यापर्यंत स्वत:चे आईवडील व जवळचे लोक वर्तणूक करतात. यास सामाजीक रूढी परंपरावादी विचारसरणी, सामाजीक दबाव इ. बाबी जबाबदार आहेत.

सुशिक्षित नवतरुणानी पोलिस, सामाजिक संस्था, संघटनांची मदत, सहकार्य व संरक्षण घ्यावे. कोणाचीही भाडभीड न ठेवता धाडसाने आंतरजातीय विवाह करावा. वर्ष – दोन वर्षातच कुटूंबीयांचा विरोध मावळून दोन जाती एकत्र येण्यास सुरुवात होते. आणि जातीअंत होण्याची वाट सुकर होते.

ब्राह्मणी धर्माचा त्याग आणि बुद्ध धम्माचा स्वीकार

जाती व्यवस्था ही ब्राह्मणी धर्माची देण आहे. वर्णव्यवस्था, उचनिचता, परस्परांचे व्यवसाय करण्यास बंदी. आंतरजातीय विवाह बंदी. अस्पृश्यता. पौरोहित्याचे ब्राह्मणी पेटंट इ. बाबी या केवळ ब्राह्मणी धर्माचे प्रतिक आहेत.

हजारो वर्षांपासून ब्राह्मणांनी भारतातील बहुजन समाजास मानसिक गुलाम बनवून ठेवले आहे. आणि त्याआधारे ते सत्ता आणि संपत्ती उपभोगत आहेत. आपसात भांडणे लावून आपली सत्ता कायम टिकवली आहे. जाती एक होऊ नयेत. म्हणून त्यांमध्ये उच्चनीचता निर्माण करून ठेवली आहे.

म्हणूनच जर जातीचा अंत करायचा असेल. तर जे तत्वज्ञान उच्चनिचतेवर आधारलेले आहे. त्या तत्वज्ञानाचा त्याग करणे आवश्यक आहे. जातीच्या अंतासाठी जनतेने वर्णव्यवस्थेवर आधारलेल्या ब्राह्मणी धर्माचा त्याग करणे अत्यंत आवश्यक आहे. तरच जातीअंत च्या दृष्टीने पाऊल पुढे पडू शकेल.

तसेच जातीअंत साठी पोषक असा अत्याधुनिक बौद्ध धम्म स्वीकारण्याची देखील गरज आहे. कारण बुद्ध धम्म हा स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेवर आधारलेला आहे. यामुळे जाती अंत वेगाने घडून येईल. आणि स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेवर आधारलेला समाज कायमस्वरूपी टिकून राहील.

स्वप्रयत्नातून स्वविकास

जात नष्ट होण्यात जसे ब्राह्मणी धर्म, शासनकर्ते अडथळा ठरत आहेत. त्याच प्रमाणे व्यक्ती स्वत:देखील जातीअंत च्या मार्गातील अडथळा ठरत आहेत. आपणास कोणत्यातरी एकाच नावेत बसता येवू शकेल. दोन नावेत आपण बसण्याचा प्रयत्न केल्यास पाण्यात पडून मृत्यू होण्याचाच जास्त संभाव आहे.

जाती व्यवस्था की जातीअंत. यापैकी समाजाने आता दोघांपैकी एकाची नाळ धरायला हवी. माणसाला स्वत:वर अन्याय होऊ नये. स्वत:ला कोणी नीच माणू नये. म्हणून जाती अंत हवा असतो. तर त्याच वेळी आपण दुसऱ्या पेक्षा श्रेष्ठ आहोत. हे व्यक्ती ब्राह्मणी धर्म आणि ब्राह्मणी व्यवस्थेच्या आधारे सिद्ध करू लागते. तेंव्हा ती व्यक्ती स्वत:सोबतच समाजाचेही नुकसान करत असते.

तसेच जर आपणास उच्च जातींच्या बरोबरीला जाऊन बसायचे असेल. तर आपल्यातील नीच प्रवृत्ती देखील व्यक्तीला संपवायला लागतील. मागास जातीतील व्यक्ती जर व्यसनी असतील. अंधश्रद्धाळू असतील. गलिच्छ राहत असतील. गलिच्छ व्यवसाय करत असतील. शिवराळपणा करत असतील. अशिक्षित असतील. अज्ञानी असतील. तर अशा व्यक्तीने कितीही आरडओरडा केला. तरी त्यास बरोबरीचे स्थान मिळू शकणार नाही.

तर त्यासाठी मागास घटकातील व्यक्तींनी स्वत:ला सुधारण्याचा प्रयत्न करायला हवा. त्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजण्याची तयारी ठेवायला हवी. स्वत:हून व्यसन, अंधश्रद्धा, शिवराळ व गचाळ भाषा, अस्वछ राहणीमान इ. चा त्याग करायला हवा. अशा रीतीने उच्च जातींचे राहणीमानानुसार स्वत:मध्ये बदल केल्यास निश्चित पणे उचनिचता व सामाजीक दरी कमी होवू शकते. व जातीअंत चे कार्य सुकर होऊ शकते.

Image Source : https://www.publicdomainpictures.net/en/view-image.php?image=24350&picture=death-daisy

जातीअंत उपाय – समाजासाठी आवश्यक
लेखक :

सचिन मोरे

संस्थापक :

ह्युमन लिबर्टी

About the author

Sachin More

Hi,
I am Sachin More
President of Human Liberty Organization
Blogger at http://humanliberty.co.in/
YouTube Creator at Human Liberty Channel

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *