जातीअंतातील अडथळे

जातीअंतातील अडथळे दूर करणे आवश्यक

जातीअंतातील अडथळे दूर करणे आवश्यक

जातीअंतातील अडथळे या विषयाचा परामर्श आपण या ठिकाणी घेणार आहोत. जातीअंत होण्यासाठी अनेक मार्ग आणि उपाय आपण योजत असताना. आपल्या मार्गातील अडथळ्यांचा देखील आपण विचार करणे. अत्यंत आवश्यक आहे. तरच आपण जातीअंतातील अडथळे  दूर करू शकतो. आणि स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेवर आधारित समृद्ध भारत निर्माण करू शकतो.

मिडीयाचा दृष्टीकोन

काही मोजकी वर्तमान पत्र आणि चॅनेल वगळता. अन्य प्रसारमाध्यमे ही ब्राह्मणी वर्चस्वाखाली आहेत. जातीअंताप्रती केवळ उदासिनच नाहीत. तर ब्राह्मणी धर्मातील विषमतेचे प्रचारक असेच त्यास स्वरूप आल्यासारखे वाटते. बातम्या अतिरंजीत करून स्वत:चा TRP किंवा खप वाढवून जाहिराती मिळविणे. हा एक धंदा होवून बसला आहे. समाज प्रबोधनाकडे प्रसारमाध्यमांचे दुर्लक्ष होत आहे.

अशा परिस्थितीत जातीअंताचे कार्य करणाऱ्यांचा पर्यायी मिडिया असणे. आणि तो मिडिया मुख्य प्रवाहात घेवून येणे. हे एक मोठे आव्हान कार्यकर्ते आणि संस्था संघटनांना पेलावे लागणार आहे.

प्रेमाविरोधी संघटना आणि समाज घटकांच्या भूमिका

शिवसेना, बजरंग दल  व तत्सम हिंदुत्ववादी संघटना या प्रेमविरांना विरोध करत आले आहेत. valentine Day, friendship Day अशा दिवशी प्रेमवीर एकमेकांना गुलाबपुष्प, भेट कार्डस व अन्य भेट वस्तू देतात. आणि आपले प्रेम व्यक्त करतात. त्यावेळी हे धर्माचे ठेकेदार त्यांना मारहाण करतात. तसेच अशा भेटकार्डांची  विक्री करणाऱ्या दुकानांची तोडफोड करतात. व फ़ुलविक्रेत्यांचेही नुकसान करतात. हा एक प्रकारचा धार्मिक दहशतवाद आहे.

पत्रकारांचे प्रबोधन

प्रेमवीर काही वेळा फ़िरायला जातात. अशा वेळी पर्यटनस्थळी प्रेमविरोधी कार्यकर्ते त्यांना मारहाण करतात. त्यांचे कडून पैसे उकळतात. त्यांचे आई वडीलांना माहिती पुरविण्याची धमकी देवूळ त्यांना लुटतात. आणि प्रेमाविरांमध्ये दहशत निर्माण करतात. काही वेळा पोलिस व स्थानिक गुंड देखील या दमदाटीमध्ये सामिल असल्याचे आढळून आले आहे. शिवाय वर्तमानपत्रे देखील तरुण पिढी वाचवा. असा सूर आळवताना दिसून आले आहेत. तथापी विकृत जातीप्रथेवर आणि जातीअंतावर भाष्य करताना मात्र पत्रकार फारसे दिसत नाहीत. अशा परिस्थितीत कार्यकर्त्यांना पत्रकारांचे देखील प्रबोधन करणे आवश्यक आहे.

प्रेमविरोधी गुंड हे प्रेमवीरांसाठी मोठी डोकेदुखी बनलेली आहे. आणि जातीयवादी समाज, चोर सोडून सन्यासाला फाशी देणारे पोलीस, आणि मूर्ख पत्रकार प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे या गुंडानाच सहकार्य करताना दिसून येतात.

या प्रेमाविरांमध्ये फार मोठ्या प्रमाणात आंतरजातीय जोडपी असतात. जर या गुंडप्रवृत्ती समाजातून दूर झाल्या. तर आंतरजातीय विवाह मोठ्या प्रमाणात घडून येऊ शकतात. आंतरजातीय विवाहांना प्रेमवीरच पुढे नेऊ शकतात. कारण जातीभेदामुळे या क्षेत्रात ठरवून विवाह होणे सध्यातरी अशक्य आहे. त्यामुळे अशा प्रवृत्ती या प्रामुख्याने जातीअंतातील अडथळे आहेत.

पोलिसांचे प्रबोधन

अशा वेळी जातीअंतासाठी काम करणाऱ्या संस्था संघटना यामध्ये प्रमुख भूमिका निभाऊ शकतात. सातत्याने पोलिसांची शिबिरे बैठका घेवून प्रेमविरांचे कायदेशीर अधिकार त्यांना समजावून सांगता येतील. आणि त्यांना त्रास देणे. किंवा त्यांच्या विरोधी भूमिका घेणे. हे त्यांच्या कायदेशीर हक्क अधिकारांचे हनन आहे. केवळ प्रेमवीर आई वडिलांना घाबरतात. किंवा घरातील व्यक्तींपासून आपली प्रेमप्रकरणे लपवून ठेवतात. म्हणजे ते चुकीचे वागतात. किंवा बेकायदेशीर वागतात असे नाही. तर सामाजिकदृष्ट्या अतिशय अडचणीत असलेले हे प्रेमवीर. यांना खरेतर पोलिसांनीच संरक्षण द्यायला हवे. हे पोलिसांना वारंवार पटवून द्यायला हवे.

ज्या प्रमाणे पोलिसांच्या बैठका घेतल्या पाहिजेत. त्याच प्रमाणे पत्रकारांना देखील बैठका, ट्रेनिंग इ. द्वारे याचे आत्मभान करून द्यायला हवे. १८ वर्षाहून अधिक वयाच्या दोन प्रौढ व्यक्तींनी प्रेम करणे. किंवा सहमतीने सेक्स करणे. हा कायद्याने गुन्हा नाही. हे पोलिसांना समजावून सांगायला हवे. तरच पोलिसांच्या लॉजवरील बेकायदेशीर धाडी आपणास रोखता येतील. प्रेमवीरांना एकट्याने सुरक्षितपणे प्रवास करता येईल. आणि  त्यांची बदनामी टाळता येईल. यामध्ये योग्य भूमिका घेतली. तर पत्रकार जातीअंतातील अडथळे न ठरता. जातीअंतातील प्रमुख दुवे ठरतील.

शिक्षक आणि पालकांचे प्रबोधन

शिक्षक आणि पालक जर मुलांच्या मागे उभे राहिले. तर समाजातील कोणीच या प्रेमवीरांना त्रास देवू शकणार नाही. मात्र सगळ्यात जास्त पालक मुलांच्या प्रेमप्रकरणाना विरोध करतात. आपल्या मुलांचे व्यक्तिस्वातंत्र स्वत: पालकच कधी मान्य करत नाहीत. ते सतत मुलांना गुलामाप्रमाणे स्वत:च्या तालावर नाचायला भाग पाडतात. आणि जातीअंतातील अडथळे ठरतात. यासाठी संस्था संघटनांनी प्रत्येक शाळा कॉलेज मध्ये शिक्षक आणि पालकांचे प्रबोधन करावे. त्यासाठी शिक्षक – पालक मेळावे आयोजित करणे अत्यंत आवश्यक आहे.

विद्यार्थी मेळावे

विविध शाळा कॉलेजातून मुलांसाठी व्याख्यान किंवा चर्चासत्र आयोजित करता येऊ शकतात. यामध्ये प्रेमवीरांना घरच्यांच्या किंवा समाजाच्या दबावाला बळी पडून जोडीदाराचे नुकसान करू नये. तर निडरपणे आंतरजातीय विवाह करण्याची हिंमत दाखवावी. आणि ज्यांच्या मध्ये ही हिंमत नाही. त्यांनी खोट्या शपथा देवून एकमेकांना फसवू नये. तर विवाह करता येणार नाही. आपण चांगले मित्र राहू. असेच जोडीदाराला स्पष्ट बोलावे. अशी शिकवण देवून या क्षेत्रात प्रामाणिकपणा यावा. यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

kiss of love

कार्यकर्ते देखील बाहेर आंतरजातीय विवाहांचे तत्वज्ञान झोडतात. मात्र घरातील मुलांनी प्रेम केले. की बरोबर उलटी भूमिका घेवून स्वत:मधील प्रतिगामित्व सिद्ध करतात. तेंव्हा कार्यकर्त्यांनी देखील स्वत:ला सतत तपासून सुधारले पाहिजे. तसेच kiss of love सारख्या चळवळी भारतभर ठीकठिकाणी व्हायला हव्यात.

आरक्षण विरोधी संघटना

जमिनीचे विभाजीकरण, शेतीचा वाढलेला खर्च आणि त्यामुळे होणारा तोटा. यामुळे शेती परवडत नाही. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे औद्योगिक वसाहती मध्ये नोकऱ्यांची कमतरता. सरकारी नोकऱ्यात कपात. या कारणांमुळे वाढलेली प्रचंड बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या.

या पार्श्वभूमीवर स्वत:च्या बेरोजगारीचे कारण हे आरक्षण व भारतीय राज्यघटना आहे. असा अपप्रचार करून सवर्ण तरुणांना भडकविण्याचे कार्य काही जातीयवादी संघटना आणि ब्राह्मण मंडळी करतात. यातून जाती जातींमध्ये तेढ व द्वेष वाढवला जातो. जातीयवादी संघटना आरक्षणास विरोध करतात. समाजात जातीय विद्वेष पसरवितात. असे कार्य करणाऱ्या असंख्य संघटना कार्यरत आहेत. त्या वरिष्ठ जातीच्या तरुणांचे माथे भडकविण्याचे कार्य करत राहतात. महाराष्ट्रात देखील संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे सारखी मंडळी हे कार्य करत आहेत. आणि यामध्ये मराठा व अन्य ओबोसी जातीतील तरुण फसत आहेत. अशा संघटना या प्रामुख्याने जातीअंतातील अडथळे आहेत.

अॅट्रोसीटी अॅकट विरोधी संघटना

अॅट्रोसीटी अॅकटला विरोध करणाऱ्या अनेक संघटना आणि व्यक्ती आज कार्यरत आहेत. खोट्या गुन्ह्यांमध्ये उच्चवर्णीय लोकांना फसवले जाते. असा ते आरोप करतात. यामध्ये आता सुप्रीम कोर्टाचे ब्राह्मण न्यायाधीशही उतरले आहेत. आणि वाट्टेल तसे निकाल देवू लागले आहेत.

वास्तविक हजारो तक्रारी या अॅट्रोसीटी अॅकटखाली पोलीस नोंदवून घेत नाहीत. घेतल्याच तर कमी प्रतीची कलमे लावतात. स्वतंत्र मोर्चा निघाल्याशिवाय केस नोंदवली जात नाही. सध्या हजारो केसेस मागील १० वर्षापासून जास्त काळ विविध कोर्टात प्रलंबित आहेत.

या पार्श्वभूमीवर हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या बोगस केसेस आहेत. तरी त्याविरोधात सवर्ण समाज रस्त्यावर उतरून मोर्चे काढतो. आणि हजारो जातीय / धार्मिक अत्याचारांवर मुग गिळून गप बसतो. या तुटपुंज्या बोगस केसेसमध्ये देखील दोन सवर्णांच्या भांडणात दलितांचा त्याच्या मजबुरीचा गैरफायदा घेवून वापर केला जातो. हे लक्षात घेतले जात नाही. इथे हा द्वेष पसरविणाऱ्या संघटना या जातीअंतातील अडथळे आहेत.

भाजप सरकार

या देशात भाजपचे सरकार आल्यापासून दलितांवरील अत्याचारांमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. दलितांचे खून, बलात्कार, मारहाण, त्यांच्या घरांवर हल्ले, घरांची तोडफोड, घरे जाळणे, बुद्ध आंबेडकर आणि रविदासांच्या पुतळ्यांची / प्रतिमांची तोडफोड, नग्न धिंडी काढणे इ. प्रकार प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. विशेषत: ज्या राज्यात भाजपचे सरकार आहे. त्या राज्यात तर याचे प्रमाण प्रचंड मोठे आहे.

या हल्लेखोरांना भाजप सरकार कडून संरक्षण दिले जाते. यामध्ये आर एस एस, बजरंग दल आणि स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या मात्र मुलत: ब्राह्मणवादी संघटना सक्रीय आहेत. जणू काही त्या सरकार पुरस्कृत संघटना असल्या सारख्याच वागत आहेत. आर एस एस कडून बहुजन तरुणांना खोटे व्हिडीओ दाखविले जातात. भाषणे करून खोटा प्रचार केला जातो. त्यांना दलितांवर अत्याचार करण्यास उद्युक्त  करण्यात येते. आणि त्यासाठी ट्रेनिंग आणि शस्त्रे पुरवली जातात.

गुजरात पॅटर्ण

दंगे होतात तेंव्हा पोलीस तक्रार नोंदवून घेत नाहीत. उलट तक्रार करणाऱ्यांचीच चौकशी सुरु करतात. सरकार दखल देत नाही. हे दंगे आणि हल्ले एका अर्थाने सरकार पुरस्कृत असतात. गुजरात पॅटर्णची अमंलबजावणी संपूर्ण देशभर करण्याचा हा सरकारी डाव आहे.  हे सरकार आल्या पासून सरहानपूर उत्तरप्रदेश, उना गुजरात, भीमा कोरेगाव इ. ठिकाणी मोठ्या प्रमाणात हल्ले करण्यात आले.

इतकेच नव्हे तर काहीतरी करून ओबीसीचे आरक्षण हटवणे. रोहित वेमुला प्रकरणाप्रमाणे विद्यापीठातील जातीय भेदभाव आणि अत्याचार. असे अनेक अत्याचार आणि भेदभाव भाजप सरकार करत आहे. जाती जातीत भांडणे लावणे. तेढ वाढविणे. असे कार्य ते करत आहेत. आणि असे करणाऱ्याना पाठीशी घालत आहेत. हे  अतिशय गंभीर स्वरूपाचे जातीअंतातील अडथळे आहेत.

इथे राजकीय कार्यकर्त्यांनी प्रमुख भूमिका निभावावी. EVM मशीनद्वारे निवडून येण्याचा भाजपचा डाव कार्यकर्त्यानी EVM मशीनविरोधी अभियान तीव्र करून उधळून लावावा. जातीयवादी भाजपा सरकार पुन्हा सत्तेवर येणार नाही. यासाठी सर्व ते उपाय योजावेत.

समाजमनावर ब्राह्मणी विचारांची पकड

आज फुले शाहू आंबेडकर पेरियार आणि अनेक विचारवंत, कार्यकर्ते यांनी जातीअंतासाठी असंख्य प्रयत्न केले आहेत. करत आहेत. तरी देखील ब्राह्मणी विचारांची पकड समाजमनावर कायम आहे. वरवर जरी कोण असे दाखवत नसले. तरी जातीवाद, उच्चनीचता माणसांच्या मनात खोलवर दडलेली आहे.

आजही आपले धार्मिक विधी उदा. लग्न, गृहप्रवेश इ. बाबतीत ब्राह्मणांच्या हस्ते पूजा केली जाते. सत्यनारायना सारखे थोतांड सुशिक्षित तरुण पिढीच्याही खांद्यावरून उतरताना दिसत नाही. अनेक महत्वपूर्ण कार्ये करण्यासाठी लोक ब्राह्मणांकडे आजही मुहूर्त पाहण्यास जातात. गृह ताऱ्यांचा मानवी जीवनावर परिणाम होणे अशक्य आहे. हे शिकलेल्या तरुण पिढीलाही कळत नाही. आणि हे लोक मुलांची पत्रिका काढण्यासाठी, लग्नप्रसंगी पत्रिका जुळवण्यासाठी आजही ब्राह्मणांचे उंबरठे झिजवत आहेत.

काही महाभाग तर घरात मनाविरुद्ध घडणाऱ्या घटना दुरुस्त करण्यासाठी देखील ब्राह्मणांकडून विधी करून घेत आहेत. आणि लोकांच्या दारात, रस्त्यांवर हळद लिंबू भरलेला दही भात, आणि कापून हळद कुंकू भरलेली लिंबे, काळ्या बाहुल्या, हिरव्या बांगड्या, आणि काही कडधान्ये ठेवून बाकीच्यानाही घाबरवत आहेत. शहरात सुध्दा याचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.

हे भट ब्राह्मण जातीयवाद पसरवण्यात प्रमुख भूमिकेत आहेत. जोपर्यंत समाज त्यांच्याकडे पाठ फिरवत नाही. तोपर्यंत ते आपले कार्य करण्यावाचून राहणार नाहीत. यासाठी अंधश्रद्धा निर्मुलन चळवळ आणि महात्मा फुलेंची सत्यशोधक चळवळ गतिमान करण्याची गरज आहे.

सत्संग, बैठका इ. मधून ब्राह्मणवादी विचारांचा प्रचार

बहुजनाना सत्संग आणि बैठकांचे अक्षरश: वेड लागले आहे. दर आठवड्याला एका ठिकाणी जमणे. आणि तासंतास प्रवचन ऐकून घरी येणे. हा अनेकांचा नित्याचा कार्यक्रम होवून बसला आहे. हिंदू धर्म, गीता यावर इथे प्रवचन होते. आणि हळूहळू चातुर्वर्ण्याचे डोस दिले जातात. हिंसा कशी बरोबर आहे. हे कृष्ण आणि रामाची उदाहरणे देवून पटवून दिले जाते. विष्णू, राम, ब्रह्मा, वामन या ब्राह्मणी देवतांचे गुणगान गायले जाते. तर बळी, वाली, रावण कसे दुष्ट आहेत. हे पटवून दिले जाते. यामुळे बहुजनाची खरी दैवते लोक मानणे सोडून देतात. आणि ब्राह्मणी देवांची महती गुणगुणत राहतात.

या सर्वाचा परिणाम म्हणून ब्राह्मणवाद्यांच्या विषारी संघटनांना जमीन तयार करून दिली जाते. अर्थात खूप सौम्यपणे जनमानस ब्राह्मणवादी बनविले जाते. की जे नंतर जातीयवादी, ब्राह्मणवादी संघटनांची बाजू घेणारे बनते. ब्राह्मणवादाच्या वेगवेगळ्या पातळ्यांवर असणाऱ्या लोकांसाठी वेगवेगळी संघटने बनलेली आहेत. पातळी उंचावली की अधिक कडव्या आणि हिंसक आणि जातीयवादी संघटनांमध्ये लोक आपसूक वळू लागतात. जय श्रीराम च्या नावाखाली जो ऊतमात या देशात चालू आहे. तो अशाच प्रकारे घडविलेल्या जनमानसाच्या आधारे. आपण हे विसरायला नको की जातीअंताची लढाई लढणारे दाभोळकर, पानसरे यांचा खून करणारे देखील सनातन प्रभात चे ब्राह्मणवादी लोक आहेत. आणि असे लोक जातीअंतातील अडथळे ठरत आहेत.

शाकाहाराचा प्रचार

शाकाहाराचा प्रचार देखील असाच जातीय द्वेष पसरविण्यासाठी मुद्दामहून केला जात आहे. बीफ म्हणजे गाई / बैलाचे मांस खाण्याला विरोध करणे. हे ब्राह्मणी संघटनाद्वारे समाजास शिकविले जाते. समाजमनावर बिंबवले जाते. गाई ही माता आहे. गाईच्या पोटात ३३ कोटी देव आहेत. त्यामुळे गाईचे मांस खाणे पाप आहे. हे शिकविले जाते.

वास्तविक दुध न देणाऱ्या भाकड गाई आणि काम न करू शकणारा जरशी किंवा म्हातारा बैल यांचा शेतकऱ्याला काही उपयोग होत नाही. उलट त्याला जगवण्याच्या खर्चामुळे त्याचे नफ्या तोट्याचे गणित बिघडते. आणि कष्टही वाया जातात. त्यापेक्षा कत्तलखान्याना विकून त्यांना चार पैसे मिळू शकतात. हा साधा व्यवहार आहे. गाईचे मांस हे चवीला अतिशय रुचकर असल्यामुळे ब्राह्मणांमध्ये यज्ञामध्ये गाय मारण्याची आणि खाण्याची प्रथा होती. आजदेखील परदेशात जावून ब्राह्मण गाईचे मांस खातात. म्हणून भाजपचे सरकार आल्यापासून गाईची मांस निर्यात वाढली आहे.

अर्थात गाईचे मांस हे पौष्टिक असते. खाण्यापिण्याच्या बाबतीत एवढी महागाई असताना बोकडाचे मटण विकत घेवून खाणे. या देशातील लोकास परवडत नाही. उलट गाईचे मटण स्वस्तात मिळते. म्हणून गरीब लोकांचे चांगले पोषण होऊ शकते. तसेच शेतकऱ्यासही चार पैसे मिळू शकतात. हे लक्षात न घेता जाणून बुजून बीफ खाण्यास विरोध करण्यात येतो.

भांडणे लावण्याचा हेतू

वास्तविक यामागे जाती जातीत, धर्मा धर्मात भांडणे लावण्याचा यांचा हेतू आहे. मुळात अनेक कत्तलखाणे हे ब्राह्मणवाद्यांच्या मालकीचे आहेत. मात्र गरीब दलित आणि मुस्लिमांना प्रताडीत करता यावे. यासाठी मनुवाद्यांनी रचलेला हा डाव आहे. उना गुजरात येथील दलित अत्याचार हे त्याचे ठळक उदाहरण. आपला परंपरागत व्यवसाय (मेलेली जनावरे ओढून आणणे. आणि त्यांच्या कातडीपासून वस्तू बनविणे.) करत असताना त्यांना अमानुष मारहाण करण्यात आली. अनेक ठिकाणी दलित आणि मुस्लिमांना गाय पाळली. गाईची वाहतूक केली. म्हणून कापण्यासाठीच केली आहे. असा संशय घेवून मारहाण करण्यात आली. हा अत्याचार करता यावा. यासाठी अनेक वर्षापासून शाकाहाराचा उदोउदो करण्यात आला होता. अर्थात शाकाहाराचा प्रचार करणारे साधू संत हे जातीअंतातील अडथळे आहेत.

यासाठी बीफ महोत्सव भरविणे, मांस विक्रेत्यांना, गाई सांभाळणाऱ्याना आणि गाईची वाहतूक करणाऱ्याना संरक्षण पुरविणे. अत्यंत आवश्यक आहे. तसेच गाय खाण्यास बंदी होवू नये. यासाठी व्यापक जनमत आणि कायदे बनविणे गरजेचे आहे. यांसाठी कार्यकर्त्यांना एका बाजूला प्रबोधन, दुसऱ्या बाजूला लढे आंदोलने तर तिसऱ्या बाजूला राजकीय संघर्ष करणे आवश्यक आहे.

कट्टरपंथीय कार्यकर्ते

प्रत्येक संघटनामध्ये काही कट्टरपंथीय कार्यकर्ते निर्माण झाले आहेत. की जे आपली संघटना आणि नेत्याला सोडून अन्य संघटनाचा आणि नेत्यांचा द्वेष करतात. त्यांना कमी लेखतात. किंवा चळवळीचे दुश्मन समजतात. यामुळे परस्परात भांडणे लागून आपसात बेकीचे वातावरण निर्माण होते. आणि त्याचा फायदा प्रस्थापित वर्गास होतो.

यामध्ये जसे हे कट्टरपंथीय कार्यकर्ते सहभागी आहेत. तसेच उच्चशिक्षित तरुण देखील आहेत. जे स्वत: कोणत्याही चळवळीत काम करत नाहीत. मात्र आपल्या अॅकॅडमीक ज्ञानाच्या आणि डिग्रीच्या जोरावर हे अक्कल पाजळतात. आणि कम्युनिस्टविरोधी जहर उगलतात. आणि जाती अंताच्या लढ्यात कम्युनिस्टांचा सहभाग घेण्याऐवजी त्यांना दूर करतात. त्यांना घातक आणि धोकादायक समजतात. आणि तसा प्रचार करतात. तर दुसऱ्या बाजूला टॉटस्कीवादी कम्युनिस्ट हे लेनिनवादी आणि स्टालिनवादी कम्युनिस्ट आणि आंबेडकरवादी कार्यकर्त्यांना दुश्मन आणि क्रांती द्रोही समजतात. या दोन्ही प्रकारचे कार्यकर्ते किंवा उच्चशिक्षित तरुण हे जातीअंतातील अडथळे ठरू लागले आहेत.  यात काही शंका नको. जातीअंतासाठी धडपडणाऱ्या कार्यकर्त्यांना अशा लोकांनाही ताबडतोबीने वठणीवर आणावे लागेल.

Image Source : https://commons.wikimedia.org/wiki/File:Metcard-barriers.jpg

जातीअंतातील अडथळे दूर करणे आवश्यक
लेखक :

सचिन मोरे

संस्थापक :

ह्युमन लिबर्टी

 

About the author

Sachin More

Hi,
I am Sachin More
President of Human Liberty Organization
Blogger at http://humanliberty.co.in/
YouTube Creator at Human Liberty Channel

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *