सम्राट अशोक

सम्राट अशोक आणि आधुनिक समृद्ध भारत

 

सम्राट अशोक आणि आधुनिक समृद्ध भारत

सम्राट अशोक ची आज २०१८ सालात देखील  आठवण येत आहे. अशोकाने केलेले कार्यच तसे उत्तुंग आहे. अशोकाने केलेली क्रांती आणि त्यानंतर पुष्यमित्र श्रुंगाची प्रतिक्रांती. त्यानंतर क्रांती प्रतीक्रांतीची चाललेली अखंड शृंखला. कुठतरी थांबावा हा खेळ. असं प्रकर्षान जाणवतंय.

बाबासाहेबांनी हा खेळ थांबावा म्हणूनच सम्राट अशोकाची राजवट राज्य घटनेच्या माध्यमातून लोकशाहीत रुपांतरीत केली. पण आता त्याला EVM चं ग्रहण लागलंय. पुन्हा एकदा देश प्रतीक्रांतीच्या उंबरठ्यावर येवून ठेपलाय. त्यामुळेच सम्राट अशोकाची त्याकाळची राजवट समजून घ्यावीशी वाटतेय. कदाचित तेंव्हाच बाबासाहेबांच्या मनातील भारत दृष्यमान होईल.

सम्राट अशोकाचे साम्राज्य

सम्राट अशोकाचा जन्म इ.स. पूर्व ३०४ ला झाला. इ.स. पूर्व २७२ ते इ.स. पूर्व २३२ हा ४० वर्षांचा राज्यकाल. वयाच्या ७२ व्या वर्षी इ.स. पूर्व २३२ ला मृत्यू.

सम्राट अशोक हे जगातील सर्वात कमी वयाचे सम्राट म्हणून उदयास आले. अत्यंत शूर असे सम्राट अशोक आपल्या आयुष्यात एक ही युद्ध हरले नाहीत. ४० वर्षांच्या राज्यकाळात त्यांनी भारत, अफगाणिस्तान, इराण, पाकिस्तान, बांग्लादेश, नेपाळ, भूतान, म्यानमार, इराण, ताजिकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान या आताच्या देशांमध्ये तर हिंदुकुश पर्वत, कंदहार, काबुल, हिरात व बलुचीस्थान, ग्रीक प्रदेश इ. प्रदेशात अशोकाचे साम्राज्य होते.

काश्मीर मधील श्रीनगर अशोकाने वसविलेले शहर आहे. सम्राट अशोकाने नेपाळमध्ये ‘ललितपुर’ नावाचे शहर वसविले हे आजसुद्धा कायम आहे. त्या ठिकाणी अशोकाने बांधलेले स्तूप व विहार आजही अस्तित्वात आहेत. सम्राट अशोकांना ‘चक्रवर्ती सम्राट’ असे म्हणतात, चक्रवर्ती सम्राट म्हणजे ‘सम्राटांचा सम्राट’

त्यांच्या राज्याचे केंद्रस्थान मगध अर्थात आत्ताचा बिहार. तर पाटलीपुत्र (आत्ताचे पटना) ही राजधानी. चक्रवर्ती सम्राट अशोकाने एवढ्या विशाल प्रदेशावर एकछत्री साम्राज्य प्रस्थापित केले. असा संपूर्ण भारतीय इतिहासात एकमेव सम्राट आहे.

राज्यकारभाराच्या सोयीसाठी सम्राट अशोकाने वायव्य, मध्य (माळवा), दक्षिणी, कलिंग अशी प्रांतवार रचना केली होती.

सम्राट अशोकाची जनहिताची कामे :

अशोकाच्या साम्राज्यात जातीरहित, नैतिक,  शिलसंपन्न गुणांचा सामाजिक विकास ९२% होता. जगातील इतर देशांमध्ये आर्थिक गुंतवणुकीचा विकास ६५% होता.  सामाजिक आणि आर्थिक विषमता नाही च्या बरोबर होती. आणि अशोकाचे साम्राज्य जागतिक महाशक्ती होते. अशोकाच्या काळात भारताची अर्थव्यवस्था खूप मजबूत होती. त्यावेळी जगातील अर्थव्यवस्थेत भारताची ३५ % भागीदारी होती. सम्राट अशोक आपल्या प्रजेला चोख न्याय देई. मृत्यूदंडाची शिक्षा नसेच.

शिक्षणाच्या प्रसाराकरिता त्याने पुष्कळ पैसा, धन दौलत खर्च केली. तक्षशीला, नालंदा, गांधार, विक्रमशीला अशा २३ विश्वविद्यालयांची त्याने स्थापना केली. यामध्ये दर्जेदार शिक्षण मिळत असे. त्यामुळे अनेक देश विदेशातून विद्यार्थी येथे शिक्षण घेण्यास येत असत. प्रवाशांच्या सोयीकरिता रस्त्याच्या दोन्ही बाजूस त्याने झाडे लावली. ठिकठिकाणी विहिरी व धर्मशाळा बांधल्या.

त्याने ठिकठिकाणी दवाखाने उघडले. औषधांचा पुरेसा पुरवठा व्हावा म्हणून औषधांच्या बागा ठिकठिकाणी लावल्या. अनेक धरणे बांधली. त्याच्या काळात जातीवाद नव्हता.

कलिंग युद्ध आणि हृदय परिवर्तन

प्राचीन कलिंग (ओडिशा, छत्तीसगडझारखंड) भिषण युद्धानंतर अशोकाने काबीज केले. अशोकाने कलिंगचे युद्ध पार पडल्यानंतर जिकलेल्या रणांगणाची व शहरांची पहाणी केली. त्यावेळेस त्याने सर्वत्र प्रेतांचे ढीग, सडण्याचा दुर्गंध, जळलेली शेती, घरे व मालमत्ता पाहिली. आणि अशोकाचे मन उदास झाले. हा विजय नाही तर पराजय आहे. असे म्हणून स्वतःला त्याने या प्रचंड विनाशाचे कारण मानले. ही दंगल, बायका मुले व इतर अबलांचा हत्या यात कसला प्रराक्रम? एका राज्याची श्रीमंती वाढवण्यासाठी दुसर्‍या राज्याचे अस्तित्वच हिरावून घ्यायचे? असे स्वतःलाच प्रश्न विचारले

ह्या विनाशकारी युद्धानंतर त्याने प्रचलित वैदिक परंपरा झुगारून हिंसेचा त्याग केला. शांती, अहिंसा, प्रेम, दया ही मूलभूत तत्त्वे असलेल्या मानवतावादी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. व नंतरच्या आयुष्यात त्यांनी स्वतःला बौद्ध धर्माच्या प्रसारास समर्पित केले.आशिया खंडात तसेच इतर प्रत्येक खंडात पसरवला होता.

चक्रवर्ती सम्राट अशोकाने केलेले धम्मपरिवर्तन :

कलिंगच्या लढाईनंतर विजय मिळवून सम्राट अशोक पाटलीपुत्र येथे आला. विजयादशमीचा तो दिवस होता. त्या दिवशी सकाळपासूनच मोठ्या प्रमाणावर स्त्री-पुरुष आणि मुले मैदानावर जमा होत होती. सर्व प्रजेच्या मनामध्ये कलिंग विजयाचा जल्लोष करण्यासाठी जमली होती. परंतु त्या मैदानात महाथेरो मोगलीपुत्त तिस्स यांच्या समवेत सम्राट अशोक आले होते. सम्राट अशोकाने विशाल जनसमुदायासमोर सर्व प्रजाजनासमक्ष महाथेरो मोगलीपुत्त तिस्स यांचेकडून बुद्ध धम्माची दीक्षा घेतली.

दुसरे धम्मचक्र प्रवर्तन

अशोकाने धम्म दीक्षेनंतर उपस्थित विराट जनसमुदायाला उद्देशून भाषण केले. बुद्ध धम्मा विषयी विवेचन ऐकून विराट जनसमुदायाने अशोकाप्रमाणे बुद्ध धम्माचा स्वीकार केला. तेव्हापासून “विजयादशमी” हा उत्सव नावारूपाला आला. धम्मविजय या नावाने तो दिवस मगध साम्राज्यात साजरा केला जात असे. हे इ. स. पूर्व २६१ मध्ये सम्राट अशोकाने केलेले बुद्धानंतरचे दुसरे धम्मचक्र प्रवर्तन होय.

सम्राट अशोकाची यात्रा

काही काळ चक्रवर्ती सम्राट अशोक हे अंगावर चीवर परिधान करून भिक्खू बनले होते. त्या काळात त्यांनी पायी प्रवास केला. लुंबिनी, कपिलवस्तू, श्रावस्ती, सारनाथ, कुशिनारा, बुद्धगया, नालंदा ते पाटलीपुत्र असा त्यांनी प्रवास केला. नालंदा मध्ये त्यांनी संघाराम बनविले. जिथे जिथे बुद्धाचे पाऊल पडले होते. तिथे तिथे सम्राट अशोकाने यात्रा केली.

धम्म प्रसारासाठी प्रयत्न

भगवान बुद्धाचे ८४००० स्कंध (उपदेश) आहेत. असे महाथेरो मोगलीपुत्त तिस्स यांनी अशोकाला सांगितले. त्यानुसार प्रत्येक स्कंधासाठी एक याप्रमाणे ८४०००विहारे मी बांधेन अशी त्यांनी प्रतिज्ञा केली. आणि ती आमलात आणली. अमेरिका ते जपान,  इंग्लड ते आफ्रिका, या सर्व जागी त्याने स्तूप आणि विहारे प्रस्थापित केली. मगध येथे त्याने इतके विहार बनविले की त्या भागाचे नावच विहार म्हणजे बिहार असे पडले आहे. त्याने तक्षशीला येथे ३ मोठे स्तूप बनविले. ते स्तूप १००-१०० फुट उंच आहेत.

तसेच मथुरा, थारीश्वर, कनोज, साकेत (अयोध्या), श्रावस्ती, प्रयाग, कोसंबी, श्रीनगर, कपिलवस्तू, कुशिणारा, काशी, सारनाथ, वैशाली, राजगृह, बुद्धगया, हिरण्यपर्वत, अशा अनेक ठिकाणी त्याने स्तूप बांधले. अशोकांच्या संदर्भातील अनेक शिलालेख भारताच्या काना कोपऱ्यात सापडतात. स्तंभ, गुहांचे दरवाजे, पर्वत इ. ठिकाणी आतापर्यंत ३३ शिलालेख प्राप्त झाले आहेत. आजही आपण ते पाहू शकतो. हे अभिलेख बांगलादेश, भारत, अफगाणिस्तान, नेपाळ, पाकिस्तान मध्ये जागोजागी सापडतात. या लेखांमुळे आपणाला भारतीय इतिहासाचे ज्ञान प्राप्त होते. या शिलालेखातून या काळची लोकभाषा, लिपी, समाजस्थिती, सभ्यता, आर्थिक व्यवहार आणि धम्म यासंबंधी सत्य माहिती मिळते.

तिसरी धम्मसंगिनी

धम्माचा विचारविनिमय होण्यासाठी सम्राट अशोकाने तिसरी धम्मसंगिनी भरवली. त्यामध्ये १००० हून अधिक भिक्खुनी भाग घेतला. ही संगिनी जवळपास ९ महिने चालली. तसेच धम्म प्रचारासाठी त्याने कित्येक देशात धम्मदूत पाठविले. असे महान कार्य सम्राट अशोकाने केले.

महेंद्र आणि संघमित्रा

महेंद्र हा सम्राट अशोकाचा मुलगा पुढे ‘महिंद्र महास्थवीर’ या नावाने प्रसिद्ध झाला. श्रीलंकेचे लोक देशात बुद्ध धम्माचे आगमन महेंद्राकरवी सांची या बौद्ध स्थळावरून झाले असे समजतात आणि महेंद्राला ‘द्वितीय बुद्ध’ समजून त्याचे स्मरण करतात. राजा देवानामपियतिस्सा याचं त्यांनी धर्मांतर केलं. आजही महेंद्रचा श्रीलंका आगमनाचा दिवस दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.

संघमित्रा हे अशोकाची मुलगी. महेंद्रानंतर संघमित्रा श्रीलंकेतील राजकुमारी ‘अनुला’ व इतर राजकुलीन महिलांना दीक्षित करण्यासाठी इ. स. पूर्व २५२ मध्ये श्रीलंकेला गेली. तिने जातांना बुद्धगया येथील प्रसिद्ध बोधीवृक्षाची एक शाखा (फांदी) सोबत घेऊन गेली. ती फांदी तिने अनुराधापूरम या नगरात लावली. तिचा झालेला विशाल वृक्ष आजही तेथे विद्यमान आहे.

संघमित्रा एक अरहंत पद प्राप्त भिक्खुणी होती. सध्याच्या बोधगया येथील बोधिवृक्ष देखील मोगल आक्रमणात नष्ट करण्यात आला होता. सुमारे चारशे वर्षापूर्वी संघामित्राने श्रीलंकेत नेलेल्या वृक्षापासून फांदी आणून सध्याच्या बोधीवृक्षाचे निर्माण करण्यात आले आहे. म्हणजेच या ऐतिहासिक बोधीवृक्षाचे जतन करण्याचे श्रेय देखील या गौरवशाली सम्राट अशोकाच्या कन्येकडे जाते.

पुष्यमित्र श्रुंगची प्रतिक्रांती

इ.स. पूर्व २३२ ला सम्राट अशोकाचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्युनंतर मौर्य राजवट ५० वर्षे चालली. त्याचा नातू सम्राट बृहद्रथ. त्याचा सेनापती पुष्यमित्र श्रुंग (ब्राह्मण) याने खून केला. आणि त्यानेच या देशात प्रतिक्रांती केली. पुष्यमित्राने बौध्द भिक्खुंचे मुंडके छाटून आणणाऱ्यास शंभर सोन्याच्या मोहरा बक्षीस ठेवल्या होत्या. या काळात लाखो बौध्द भिक्खूच्या कत्तली करण्यात आल्या. तसेच मनुस्मृती नावाचा कायदा करून नागवंशियांचा वंश विच्छेद करण्याचे कार्य केले.

अशा या वंश, धम्म विद्ध्वंसक पुष्यमित्र श्रुंग याचे आज देखील भारताचे शेजारील बौद्ध राष्ट्र चीनमध्ये नाव घेणे देखील पसंत केले जात नाही. इतकी त्याच्याबाबत घृणा आहे. पुष्यमित्र श्रुंग याला बौद्ध धम्मावरचा शाप मानले जाते.

आपण प्रतीक्रांतीच्या प्रभाव क्षेत्रामध्ये राहत असून पुष्यमित्र श्रुंगाच्या प्रतिक्रांतीचे परिणाम आपण भोगत आहोत. त्याने याच काळात रामायण, महाभारत, पुराणे इ. लिहून काढली. सर्व बौद्धांना वैदिक धर्मात जबरदस्तीने सामावून घेतले. जे आले नाहीत त्यांच्यावर अस्पृश्यता लादली. ब्राह्मण पुरुष सोडून इतरांना शिक्षणास बंदी केली. चातुर्वर्ण्य व्यवस्था प्रस्थापित केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सम्राट अशोक, आणि  भारतीय राज्यघटनेची निर्मिती

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सम्राट अशोकाचा आदर्श समोर ठेवून भारतीय राज्यघटनेची निर्मिती केली. राज्यघटनेनुसार देशाच्या राष्ट्रध्वजावर अशोकचक्राचा देशाने स्वीकार केला आहे व देशाची राजमुद्रा म्हणून सारनाथ येथील स्तंभावरील चार सिंहाच्या प्रतिकृतीचा राजचिन्ह सन्मान पूर्वक स्वीकार करण्यात आला. तसेच राष्ट्रपती भवनात ‘धम्मचक्र प्रवर्तनाय’ या सम्राट अशोकाचा दिव्य संदेशाला सन्माननीय स्थान दिले. पाली भाषेला राष्ट्रीय भाषेत स्थान दिले. मगध साम्राज्यामध्ये विशेषकरून सम्राट अशोकाच्या कालखंडात जी राज्यव्यवस्था होती ती राज्यव्यवस्था समाविष्ठ करण्याचा प्रयत्न केला. अशोकाच्या काळात जनतेला जे हक्क प्राप्त होते आणि जे स्वातंत्र्य जनता भोगत होती ते सर्व बाबासाहेबांनी राज्यघटनेत नमूद केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे  ‘धम्मचक्र प्रवर्तन’

तसेच १४ ऑक्टोबर १९५६ रोजी अशोक विजयादशमी दिनी ऐतिहासिक ‘धम्मचक्र प्रवर्तन’ करून बौध्द धम्माचे पुनरुत्थान केले. व भारतातील नागवंशियांच्या गौरवशाली वारश्यासोबत भूमिपुत्रांना जोडण्याचे कार्य केले. आजही त्यांचे भारत बौद्धमय करण्याचे स्वप्न अधुरेच राहिले आहे.

EVM मशीनचा गैरवापर  अर्थात भारतीय राज्यघटनेस धोका

अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये संघर्ष करून बाबासाहेबांनी आपल्याला जे हक्क अधिकार मिळवून दिले ते सध्याची ब्राह्मणी व्यवस्था आपल्याकडून हिसकावून घेत आहे. आणि ते हिसकावून घेण्यासाठी EVM मशीनचा गैरवापर करत आहे. आता या EVM मशिन विरुद्ध तीव्र लढा उभारावा लागणार आहे. कारण सध्या भारतावर जे राज्य करत आहेत ते भाजप आणि कॉंग्रेसचे लोक EVM मशिन हॅक करून म्हणजेच त्याचा दुरुपयोग करून निवडून येत आहेत. आणि या देशाची संपत्ती आणि करोडो लोकांचे श्रम भांडवलदाराना खिरापत म्हणून मोफत वाटत आहेत. आणि ब्राह्मणी राजवट प्रस्थापित करू पहात आहेत.

हे प्रतीक्रांतीकारक  ब्राह्मण लोक नुसते हे करून थांबणार नाहीत. तर त्यांना पुष्यमित्र श्रुंग किंवा पेशवाईची राजवट पुन:प्रस्थापित करायची आहे. एनकेन प्रकारेन या ब्राह्मणांना ताळ्यावर आणावं लागेल. अन्यथा अत्यंत क्रूर अशी मनुस्मृतीची राजवट या भारत देशात पुन:प्रस्थापित झाल्या शिवाय राहणार नाही. पुष्यमित्र श्रुंग आणि पेशव्यांचे हे वारसदार हिटलर आणि मुसोलिनी पेक्षाही अधिक क्रूर  आहेत.

सम्राट अशोक आणि आधुनिक समृद्ध भारत
लेखक :

सचिन मोरे

संस्थापक :

ह्युमन लिबर्टी

About the author

Sachin More

Hi,
I am Sachin More
President of Human Liberty Organization
Blogger at http://humanliberty.co.in/
YouTube Creator at Human Liberty Channel

View all posts

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *