शिवछत्रपती पुरस्कार

शिवछत्रपती पुरस्कार’ प्राप्त अपंग सुजाताकडे शासनाचे दुर्लक्ष

‘शिवछत्रपती पुरस्कार’ प्राप्त अपंग सुजाताकडे शासनाचे दुर्लक्ष.

खरंच शिवछत्रपती पुरस्कार’ प्राप्त अपंग सुजाताकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. या जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारी मना शोधूनी पाहे. ‘माणूस’ सर्वात मोठा प्राणी आहे. सर्व गोष्टींमध्ये श्रेष्ठ असा माणूस. जीवनाच्या कातर वेळी मात्र त्याला सर्व जगाची भीती वाटू लागते. असे का? तर लहानपण खेळण्यात संपत. तरुणपण मनाच्या धोक्यात झोपून घालवतो. ज्यावेळी वृद्धापकाळाची जाण होते. तेंव्हा माणसाची झोप उडते. माणूस सर्व जीवनाची वजाबाकी करायला लागतो. परंतु हाती काय लागतं ज्याचं त्यालाच माहित. त्यात अपंगत्व असे तर कोणाला न दाखवता येणारे अश्रू. न सांगता येणाऱ्या वेदना. या सर्वांचा मिलाप करीत करीत एक एक दिवस घालवायला सुरुवात होते. अश्रू व वेदना लपविणे म्हणजे स्वाभिमान. ज्या व्यक्तीमध्ये स्वाभिमान असतो. तो जीवनाची लढाई लढण्यास समर्थ असतो.

अशाच माझ्या एका मातेची हि कथा आहे. नाव सुजाता अभय पवार. वय ५५, पुणे. नावाप्रमाणेच असणारी सुजाता हिला लहानपणीच अपंगत्व आले.  बालपण जात होतं आई वडील उपचार करीत होते. सुजाता शाळेत जावू लागली. शाळेत गेल्यावर वेगवेगळया विषयांवर प्राविण्य मिळवू लागली.  दहावी, बारावी, बी.कॉम पर्यंतचे शिक्षण सुजाताने सर्व परिस्थितीवर मात करून पूर्ण केले. त्या बरोबरच स्विमिंग, व्हीलचेअर रेस, गोळा फेक, भाला फेक, या खेळांची आवड. आता स्पर्धेत बदलू लागली.  सुजाता आता स्पर्धा मधून जिल्हा, केंद्र, राज्य, राष्ट्रीय, परदेशी खेळायला जावू लागली. तिथे तिला बरेच पारितोषिक मिळू लागली. नव्हेतर सर्वश्रेष्ठ असा ‘शिवछत्रपती पुरस्कार’ देखील तिला मिळाला.

या दरम्यान सुजाताला अभय नावाचा जोडीदार मिळाला. अभय हि अपंगच.  सुजाताने संसाराला सुरुवात केली. परंतु म्हणतात ना, एखाद्याच्या नशिबी कष्ट म्हटले की ते संपत नाहीत. सुजातचही असचं. दोघं अपंग एकमेकांच्या आधाराने कष्ट करून आपल्या संसाराचा गाडा ओढू लागले. शासन नावाच्या व्यवस्थेला मात्र त्याचं काहीही सोयरसुतक नव्हतं. इथे लता ने एक ओळ गायली की तिला मात्र शासन लयलूट करते. किंवा सचिनने एक सिक्स मारला की त्याच्या खात्यात कोटीने रक्कम जमा होते. परंतु  सुजाता राज्य, देश यांच्यासाठी खेळून साधी शिपायाची नोकरी सुद्धा तिला मिळाली नाही.

शिवछत्रपती पुरस्कार’ प्राप्त अपंग सुजाताकडे शासनाचे दुर्लक्ष.

हा अपंगावर झालेला अन्याय नाही का? मग शासनाला काय दंड करायचा? कोणती शिक्षा ठोठवायची? शासनावर मानहानीचा दावा लावायचा का? सुजाता सारखे अनेक अपंग ‘शिवछत्रपती पुरस्कार’ विजेते आहेत. यांचही  असचं आहे. शिव छत्रपतींच्या महाराष्ट्र राज्यात जर त्या पुरस्काराला किंमत नाही. तर बाहेर काय असणार? तरीही सुजाता संसाररुपी सागरात आनंदाने डुंबत आहे. कारण तिचं नावच सुजाता आहे.

‘शिवछत्रपती पुरस्कार’ प्राप्त अपंग सुजाताकडे शासनाचे दुर्लक्ष.

लेखिका

सविता मोरे.

संस्थापक –

उत्कर्ष अपंग संस्था, पुणे

 

 

About the author

Savita More

Hi,
I am Savita More.
Founder & President of Utkarsh Apang Sanstha.
State Committee Member of Human Liberty Organization.

View all posts

2 Comments

  • शासनाने या गोष्टींचा काळजीपूर्वक विचार करुन अपंगाना न्याय दिला पाहिजे
    सर्व अपंग बंधु -भगीनीना अपंग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व अपंग सक्षम होवो
    सर्वांचा उत्कर्ष होवो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *