व्यसनाधीनता

व्यसनाधीनता पुरोगामित्वाच्या वाटचालीतील मोठा अडथळा

व्यसनाधीनता पुरोगामित्वाच्या वाटचालीतील मोठा अडथळा

खरोखरचं व्यसनाधीनता पुरोगामित्वाच्या वाटचालीतील मोठा अडथळा आहे. २१ व्या शतकाकडे माहिती तंत्रज्ञानाच्या आधुनिक प्रगतीशील युगाकडे आपण वाटचाल करत आहोत. मात्र व्यसनाधीनता हा आजच्या मानवी प्रवृत्तीला जडलेला असाध्य रोग असाच याचा नावलौकिक आहे. माणसाने जुन्या रूढी, प्रथा-परंपरा, अंधश्रद्धेचा उंबरठा ओलांडला. आणि आता माणूस नव्या उमेदी, नवीन जिद्द, नवीन दृष्टीकोन, नवनवे शोध या सर्व नाविन्याचा शोध घेत आहे.

आजची पिढी ही आधुनिकतेच्या उज्वल सूर्याची कास धरतो आहे. या असामान्य कर्तुत्वाला भरभरून कौतुक केले तरी कमीच. परंतु याच कर्तुत्वाला आजच्या काळात व्यसनाधिनतेचा रोग जडला आहे. अशीच परिस्थिती जगातील प्रत्येक देशामध्ये दिसून येते. प्रगतीच्या आणि नव्या क्षितिजाकडे वाटचाल करण्याच्या प्रक्रियेत व्यक्तीला कौतुक आणि प्रोत्साहन मार्गदर्शनापेक्षा व्यसनाधीनतेमध्ये गढून त्याचे अंतरंग चोखाळत बसण्यात आणि त्यातच रममाण होण्यात जास्त आनंद वाटतोय. वैयक्तीकरनाचा, भांडवलशाही वृत्तीचा आणि स्वकेंद्रीतता या समाजशिलतेला घातक असणाऱ्या मनोवृत्तीला आता व्यसनाधीनता हा रोग जडला आहे. माणसाच्या सांघिक समाजशील समाजवादाला, सर्वसमावेशकतेला हादरा देण्याचे कार्यामध्ये व्यसनाधीनता आणखी एक भर टाकते.

माणूस नव्या उमेदी आणि प्रगतीच्या पाऊलावाटांपासून दूर जातो आहे.

जगाचा विचार करण्यापूर्वी भारताचाच विचार करणे येथे जास्त महत्वाचे ठरले. कारण जगाच्या पाठीवर भारतच असा देश आहे. की जेथे सर्वात जास्त संघर्ष हा परिवर्तन आणि पारपांरीकता यांमध्ये घडून आलेला आहे. या देशाची समाजरचनाच मुळी विषमतेच्या आणि वर्चस्वाच्या अधीन आहे. डॉ. भी.रा. आंबेडकर आपल्या क्रांती आणि प्रतिक्रांती या ग्रंथामध्ये प्रतिपादन करतात. ‘ आपल्या देशातीन परिस्थिती ही व्यवस्थेला बदलण्या करीता परंपरावादी मुल्ये त्याच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण करतात.’ वरील  सिद्धांताचे परीक्षण केल्यास असे निदर्शनास येते. की रूढी व्यवस्था मानवाच्या प्रगतीसाठी अडथळा निर्माण करीत असेल तर. त्या व्यवस्थेला बदलण्याकरिता किंवा ती व्यवस्था मोडीत काढण्याकरिता. नवी मुल्ये नव्या विचारांची कास धरून तिला समाजामध्ये रुजविण्यात येते. परंतु परिवर्तनाचे द्वेष्टे असणाऱ्या काही समाजविघातक शक्तीमुळे मात्र माणूस नव्या उमेदी आणि प्रगतीच्या पाऊलावाटांपासून दूर जातो.

रूढ व्यवस्थाच कायम ठेवणे हेच काही मुठभर लोकांचे लक्ष्य आहे.

वरील परिस्थिती लक्षात घेता आपणास येथे परस्पर तसेच संभ्रम निर्माण करणारी आहे. विचार, चिंतनशीलता संशोधक वृत्ती आणि अध्ययनशिलता यामध्ये बसने आणि त्यातून नवनवीन विचार, दृष्टीकोन, तंत्रज्ञानाची निर्मिती करून आपली समाजव्यवस्था अधिक सदृढ संपन्न बनविणे हीच शिकवण या देशातील साधू संतांनी आणि समाज सुधारकांनी दिली होती. परंतु परिवर्तनाचे आजन्म द्रष्टे असणाऱ्या काही समाजविघातक लोकांनी हा वारसा घेतला हे विचार पूर्णपणे बरखास्त करून आजच्या तरुणाला रूढी प्रथा परंपरांच्या जाळ्यात अडकवून ठेवले आहे. समाजाचे एकूण चित्र असे झाले आहे की व्यक्ती व्यसनाधीन होऊन धर्म, रूढी, प्रथा परंपरांचे मनोभावे पालन करीत असेल तर त्याचे आदर्श डोळ्यापुढे ठेवावे. परंतु जर आपल्या शिक्षणातून किंवा नव्या मुल्यातून रूढ व्यवस्थेच्या विरोधात कुठलेही पाऊन उचलले तर हे कदापी सहन होणार नाही. यामध्ये नैतिक मुल्ये, आधुनिक विचार, सामाजिक प्रगती, मानवी परिवर्तन अशी कितीही योग्य मुल्ये असली तरी रूढ व्यवस्थाच कायम ठेवणे हेच काही मुठभर लोकांचे लक्ष्य आहे. याच परिस्थितीचे दर्शन आपणाला इतिहासामध्ये घडते.

तथागत गौतम बुद्ध

या ठिकाणी मला आवर्जून एका व्यक्तीचा उल्लेख करावासा वाटतो. ज्यांच्या उपदेशाने ग्रंथप्रामाण्यवाद, व्यक्तिवाद तसेच पारलौकीकवादाला तडा बसला आणि नवमतवादाचा, विज्ञानवादाचा आणि भौतिकवादाला करुणा क्षमाशिलतेची  जोड देवून मानवाच्या नैतिक मूल्यांचा विकास झाला. ते व्यक्ती म्हणून तथागत गौतम बुद्ध होत.

नैतिक, भौतिक, बौद्धिक विकासाचा मार्ग

इ.स. २५०० वर्षापूर्वी तथागतांनी पंचशील देवून आपल्या भिक्खू संघाला नैतिक, भौतिक, बौद्धिक विकासाचा मार्ग दाखवून मानवाला ईश्वर, स्वभाव, मनोवृत्ती, ग्रंथाप्रमाण, निष्ठाभाव इत्यादी परावलंबी तत्वांपासून मुक्त राहण्याची दीक्षा दिली. बुद्धांनी जे संदेश आपल्या भिक्खू संघाला दिले त्या सर्व उपदेशांचे संकलन त्रिपिटक (तिपिटक) या ग्रंथात समाविष्ठ केले आहे. तथागतांनी आपल्या करुणा उपदेशा सोबतच नैतिक आचरणाची तत्वे दिली जी त्यांच्या पंचशिलाच्या सुक्तात गुंफण्यात आली आहे. याच पंचाशिलातील एक सुक्त विषयाच्या अनुषंगाने नमूद करावेसे वाटते.

आपला उद्धार करणे आणि आत्मोन्नती प्राप्त होणे हे आपल्याच हाती असते.

“सुरा-मेय्य–मज्ज पमादठ्ठाना वेरमणी,

सिक्खापदं समादियामी |”

या सूक्ताप्रमाणे मी सर्व प्रकारच्या मादक पदार्थांचे सेवन करण्यापासून अलिप्त राहण्याची शिक्षा ग्रहण करतो. येथे तथागत असे सांगतात की, ‘आपला उद्धार करणे आणि आत्मोन्नती प्राप्त होणे हे आपल्याच हाती असते.’ बुद्धीला, विचारांना, दृष्टीला सम्यक बनवून भावनांवर नियंत्रण ठेवून आपण आपली प्रगती साधू शकतो. एवढा मोलाचा उपयुक्त संदेश तथागतांनी इस. २५०० वर्षापूर्वी दिला परंतु स्वत:ला आधुनिक म्हणविणाऱ्या तरुणाला याचा विसर पडलेला दिसतो. अशा परिस्थितीमध्ये एकाच प्रश्न डोळ्यापुढे येतो की, आपला इतिहास जर इतका परिवर्तनशील आणि ज्ञान समृद्ध विचार होता तर मग वर्तमान का म्हणून रसातळाला जातोय? बरे या परिस्थितीला दोषी कोण? असे कोणी विचारले तर भाग्य, मागील जन्माचे पाप, दैव कारणीभूत, नशिबातच नाही असले कर्तुत्वशून्य शब्दांच्या जाळ्यात अडकून हात वर करणे ही रीत मानतो. याच परावलंबी, भोळ्या, सनातनी वृत्ती बाळगणाऱ्या व्यसनाधीन, आस्तिक मनुष्यांना थानाकावीन सांगताना मला जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आठवतो.

तुकोबा म्हणतात –

“ऐसे कैसे झाले कली |

तोंडी तमाखूची नळी ||

स्नान संध्या बुडविली |

पुढे भांग उडविली ||

भांग भुरका हे साधन |

पचनी पडे मद्यपान ||

तुका म्हणे एवढे सोंग |

तेथे कैसा पांडुरंग ||

याचा सारांश असा की,

व्यसनाधीनता पुरोगामित्वाच्या वाटचालीतील मोठा अडथळा

आधुनिक युगामध्ये व्यक्तीची बुद्धी, ज्ञान, प्रगल्भता, अध्ययनशिलता, चिंतनशीलता या सर्वांचा अगदी झपाट्याने विकास झालेला असताना मात्र आपल्या क्षणिक सुखासाठी किंवा दु:खाचे क्षमण अथवा दमन करण्यासाठी मानव व्यसनाच्या आहारी जातो ही गोष्ट एका आधुनिक व्यक्तीसाठी त्याच्या विकासासाठी पोषक आणि पूरक ठरते असे मला तरी वाटत नाही.

जाता जाता एक सांगावयाचे होते.स्वानंद, स्वैराचार वृत्ती म्हणजे आधुनिकता अशी जर कुणाची धारणा असेल तर तो गैरसमज आहे. विज्ञाननिष्ठा, व्यसनमुक्ती, सम्यकविचार, सम्यकआचार, समाजवादी मुली इत्यादींची कास धरली. व त्यानुसार वाटचाल करण्यास सुरुवात केली. तर निश्चितच “जो जे वांछील ते ते लाहो प्राणी जात.” हे ज्ञानदेवांचे पसायदान मानव कल्याणाच्या दृष्टीने सार्थक ठरेल असे मला वाटते.

Image source : https://www.pexels.com/photo/addict-addiction-addictive-adult-837943/

व्यसनाधीनता पुरोगामित्वाच्या वाटचालीतील मोठा अडथळा
व्यसनाधीनता

लेखक – कॉम्रेड अभिलाष चौधरी

संस्थापक – समलैंगिक पुरोगामीत्वाचे वारसदार (revolution against sec377act)

About the author

Abhilash Choudhary

Hi,
I am Abhilash Choudhary.
State Committee member of Human Liberty Organization.

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *